|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » जामीन आणि इमारत भाडय़ाने दिल्यास जीएसटी लागणार

जामीन आणि इमारत भाडय़ाने दिल्यास जीएसटी लागणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जमीन किंवा इमारत भाडय़ाने दिल्यास त्यावर आता वस्तु आणि सेवाकर अर्थात जीएसटी द्यावा लागणार आहे, त्यामुळे 1 जुलैपासून जीएसटी लागू झाल्यास आता नव्या कराची भर पडणार आहे.

केंद्र सरकार 1 जुलैपासून जीएसटी लागू करण्याच्या तयारीत आहे. यावर सहमती झाली असून कोणत्या वस्तु, कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये ठेवायच्या यावर चर्चा सुरू आहे. मात्र जमीन आणि इमारतीच्या विक्रीला जीएसटीच्या कक्षेतुन बाहेर ठेवले जाईल त्यावर आताप्रमाणेच स्टॅम्प डय़ुटी लागेल तसेच वीजेलाही जुएसटीमधुन वगळय़ाचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत सांगितले. 1 जुलै 2017 पासून लागू होणाऱया जीएसटीमध्ये केंद्रीय उत्पादन शुलकर, सेवा कर आणि राज्यातील व्हॅट यांसारखे तमाम अप्रत्यक्ष कर समाविष्ट असतील. केंद्रीय जीएसटी विधेयकानुसार, कोणत्यासी स्वरूपात जमीन भाडय़ाने दिल्यास, जामीन हस्तांतरणाच्या परवान्यावर जीएसटी लागू होईल. तसेच कोणत्याही इमारतीचा पूर्ण किंवा अर्धा भाग भाडय़ावर दिल्यासही जीएसटी लागेल. हा कर रहिवासी आणि औद्योगिक क्षेत्रांमधील इमारतीवर लागू होईल.