|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Automobiles » होंडाच्या टू व्हीलरवर तब्बल 18 हजारांची सूट

होंडाच्या टू व्हीलरवर तब्बल 18 हजारांची सूट 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्याने, धाबे दणाणलेल्या वाहन कंपन्यांनी गाड्यांवर भरघोस सूट दिली आहे.होंडाने स्कूटरवर तब्बल 13 हजार 500 रुपये इतकी भरघोस सूट दिली आहे.  तर मोटारसायकलवर तब्बल 18 हजार 500 रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे.

आज आणि उद्यापर्यंतच गाड्या बूक करणाऱ्यांना ही सूट मिळणार आहे. या गाड्या खरेदी केल्यानंतर उद्यापर्यंतच नोंदणी करायची आहे. त्यानंतर या गाड्यांची नोंदणी होणार नाही.

तुम्हाला कोणत्या शहरात, कोणती बाईक हवी आहे, हे कंपनीला तातडीने कळवावं लागले. किंवा थेट डिलरशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेता येईल.

आज आणि उद्या या बाईक खरेदी केल्यानंतर उद्यापर्यंतच त्याची नोंदणी (रजिस्ट्रेशन) होणं आवश्यक आहे. कारण 1 एप्रिलपासून BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या नोंदणीला मनाई करण्यात आली  आहे.