|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Automobiles » 25 लाखांत PG Bugatti Cycle

25 लाखांत PG Bugatti Cycle 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

फ्रान्सची हाय परफॉर्मेन्स कार निर्माता कंपनी बुगाटीने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी हायटेक पी. जी. बुगाटी सायकल नुकतीच लाँच केली आहे. या नव्या सायकलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला असून, ही सायकल 25 लाखांत ग्राहकांना मिळणार आहे.

असे असतील या सायकलचे फिचर्स –

– ब्रेकिंग सिस्टिम – 95 टक्के मटेरिअल प्रेम, रिम्स, फोक, हँडल बार, सीट, सीट पोस्ट, क्रँक आणि ब्रेक्स उपलब्ध असलेली ही सर्वात महागडी आणि हाय क्वालिटीचे कार्बन फायबरपासून बनवण्यात आलेली सायकल असणार आहे. पी. जी. कंपनीने या कार्बन कम्पोनेटस्ला जर्मनीमध्ये डिझाइन केले.

– स्पोर्ट रायडिंग – बुगाटी कंपनीने सांगितले, विशेषतः स्पोर्ट रायडिंगसाठी ही सायकल लाँच करण्यात आली आहे. लाइट वेट पेमच्या तंत्रज्ञानात ही सायकल बनवण्यात आलेली आहे. ही सायकल 4 किलो इतकी आहे. त्यामुळे रायडरला ही सायकल चालवण्यासाठी हालकी अशी वाटणार आहे.

या सायकलमध्ये सुपर कारसारखे ऑप्टिमल एअरोडायनॅनिक्स असून, यावर लक्ष ठेवत बुगाटी सायकल बुगाटी कारसारखी वेगाने धावू शकेल. या सायकलमध्ये शॉक ऑब्सर्शन बार देण्यात आले आहे.