|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सर्वोच न्यायालयाच्या निर्णयामुळे दारु व्यावसायिकांना मोठा दणका

सर्वोच न्यायालयाच्या निर्णयामुळे दारु व्यावसायिकांना मोठा दणका 

प्रतिनिधी/ पणजी
सर्वोच न्यायालयाच्या निवाडय़ाने गोव्यातील दारु व्यवसायिकांना मोठा दणका बसला आहे. या निवाडय़ामूळे 3200 दारु व्यवसायकांचा धंदा 1 एप्रिलपासून बंद होणार आहे. मात्र या प्रकरणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तोडगा काढून बार मालकांना दिलासा देतील असा विश्वास आपल्याला आहे असे, बार मालक संघटनेचे अध्यक्ष दत्तपसाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणूका आणि आचारसंहीता या दोन्ही गोष्टींचा मोठा दणका बार मालकांना बसला आहे. सर्वोच न्यायालयाने बार बंदीबाबत जो निर्णय घेतला त्या निर्णयाची प्रत 26 डिसेंबरला हातात मिळाली व त्यानंतर आठ दिवसात आचारसंहीता लागू झाली त्यामूळे पुढील प्रक्रीया होऊ शकली नाही. मेघालया व सिक्कीम या दोन राज्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र गोव्याच्या बाबतीत तसे होऊ शकले नाही. गोवा राज्यही छोटे आहे, ज्यावेळी गोव्याचा विषय न्यायालयात आला तेव्हा न्यायाधीश म्हणाले गोव्याचा प्रतिनिधिच इथे उपस्थित नाही त्यामूळे गोव्याला हा निर्णय मान्य आहे. या निर्णयामूळे थेट 3200 कुटुंबावर परिणाम होणार आहे त्याचबरोबर अन्य संबधित मिळून 15 ते 20 हजार कुटुंबावर याचा परिणाम होणार आहे. या विषयात गोवा आपली बाजू मांडण्यास कमी पडला मात्र मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असून ते या प्रकरणी न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करुन बार मालकांना दिलासा देतील असे ते म्हणाले.

Related posts: