|Thursday, April 26, 2018
You are here: Home » मनोरंजन » ‘गोलमाल -4’ मध्ये झळकणार संजय दत्त

‘गोलमाल -4’ मध्ये झळकणार संजय दत्त 

ऑनलाईन टीम / मुंबई :

दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या आगामी ‘गोलमाल-4’साठी सज्ज झाला आहे. अजय देवगण, अर्शद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘गोलमाल -4’विषयी प्रेक्षकांमध्येच भलतीच उत्सुकता पाहायला मिळात आहे. या उत्सुकतेत आत अजून एक भर पडली आहे. नुकताच अजय देवगण याने आपल्या ट्विटर आकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्याफोटोमध्ये ‘गोलमाल -4’च्या टीमसमवेत अभिनेता संजय दत्तही दिसत आहे.

आता संजय गोलमाल -4 मध्ये नेमकी काय भूमिका करतोय हे सांगण कठीण आहे. कारण या फोटोला ‘द ओरिजनला रॉक्सटार’ अशी कॅप्शन अजयने दिली आहे. त्यामुळे ‘गोलमाल-4’ च्या टीममधला संजय दत्त हा एक नवीन चेहरा तर नाही ना ? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

 

Related posts: