|Monday, February 18, 2019
You are here: Home » Top News » आजपर्यंत केंद्र सरकारने 1200 कायदे रद्द केले : पंतप्रधान

आजपर्यंत केंद्र सरकारने 1200 कायदे रद्द केले : पंतप्रधान 

ऑनलाईन टीम / अलाहाबाद :

केंद्र सरकार नवीन कायदे किती बनवेल हे माहिती नसले, तरी आता आम्ही रोज एक कायदा रद्द करणार असून, आजपर्यंत 1200 कायदे रद्द केले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

अलाहाबाद उच्च न्यायालयाला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे. एस. खेहर, केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते. पंतप्रधान म्हणाले, आजपर्यंत केंद्र सरकारने 1200 कायदे रद्द केले असून, आगामी काळात रोज एक कायदा रद्द करणार आहे. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाचे कामकाज संपवण्यास मदत मिळेल, असेही ते म्हणाले. याशिवाय खटल्याची तारीख एसएमएसने मिळायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Related posts: