|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » विनयशीलता व समता-लोकशाहीचे प्रधान लक्षण!

विनयशीलता व समता-लोकशाहीचे प्रधान लक्षण! 

गुढी पाडव्याच्या दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची क्रिकेट कसोटी मालिका जिंकली, पण शेवटच्या सामन्यात एक नवलाईची घडलेली गोष्ट म्हणजे फिट नसल्यामुळे सामना न खेळणारा कर्णधार विराट कोहली खेळादरम्यान पाण्याची बाटली स्वतः घेऊन मैदानात गेला व भारतीय गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीबद्दल कौतुक करीत काही टिप्स दिल्या… विराट हा आज क्रिकेटचा सुपरस्टार आहे, पण संघासाठी व नव्या खेळाडूंना टिप्स देण्यासाठी पाणी मैदानात घेऊन जाताना त्याला संकोच वाटला नाही. त्यानं या कृतीनं उत्तम संघवृत्तीचं उदाहरण जसं घालून दिलं तसंच नम्रता, सहकाऱयांप्रती आस्था आणि आपण कर्णधार म्हणजे कुणी विशेष नाही याचा त्यानं प्रत्यय आणून देत चांगल्या मानवी वर्तनाचा पैलू सहजतेनं दाखवून दिला आहे. विनयशीलता व टीमचे सर्व खेळाडू समान असतात व संघवृत्ती महत्त्वाची याचाही विराट कोहलीनं आपल्या वर्तनानं वस्तूपाठ घालून दिला आहे. सध्या भारताच्या एका खासदाराचं विमानातलं चप्पल मारहाणीचं प्रकरण गाजत आहे. त्याद्वारे माझं लोकप्रतिनिधी म्हणून विशेष स्थान व हक्क आहेत, ही मध्ययुगीन काळाची सरंजामी गुर्मी दिसते. विराट कोहलीला बाराव्या खेळाडूऐवजी स्वतः मैदानात जाण्याची गरज नव्हती, पण त्याला ते संघासाठी व भारताच्या विजयासाठी करावंसं वाटलं. यातच त्याचं अनुकरण करण्याजोगं माणूसपण दडलं आहे. भारतात सध्या चप्पल प्रकरणामुळे जसं एका खासदाराचं नाव चर्चेत आहे, तसंच ब्रिटनच्या एका खासदाराचं, पण ते कौतुक व आदरामुळे आणि धाडस व सौजन्यशीलतेमुळे, लंडनला 22 मार्चला ब्रिटिश संसदेजवळ अतिरेकी हल्ला झाला होता, तेव्हा हाऊस ऑफ कॉमन्सच्या प्रवेशद्वारी रक्षणासाठी उभा असलेला एक सामान्य कर्मचारी कीथ पामर हा गंभीर जखमी झाला. त्यावेळी सुरक्षेसाठी संसद बंद करण्यात आली होती. पण मूळचा सेनाधिकारी असलेला खासदार टोबियस इलवूड हा आपल्या जीवाची पर्वा न करता धावला, त्यानं बेशुद्ध पडलेल्या व नाडीचे ठोके मंद पडत चाललेल्या कीथ पामरला त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवीत हवा देत वाचवायचा प्रयत्न करू लागला. काही वेळानं तिथे वैद्यकीय पथक आलं व पामरला दवाखान्यात नेलं. पामरच्या रक्तानं माखलेलं इलवूडचा शोकाकूल चेहरा टीव्हीवर नंतर दाखवला गेला, तेव्हा साऱया ब्रिटनच्या नागरिकांनी इलवूडच्या धीरोदात्त वर्तनाचं कौतुक केलं. दुसऱया दिवशी संसदेत अतिरेकी हल्ल्याबाबत चर्चा होती, पण इलवूडनं बोलायचं टाळलं. कारण त्याला आपण जे केलं त्याचं भांडवल करीत, गाजावाजा करत जगापुढे स्वस्त प्रसिद्धी करून घ्यायची नव्हती.

इलवूड हा ब्रिटनचा खासदार. म्हणजेच आपल्या चप्पलफेम खासदाराप्रमाणे खास माणूस. पण त्यानं आपला जीव धोक्मयात टाकला तो कुणासाठी? एका मामुली आम पोलीस कर्मचाऱयासाठी. आपल्या भारतात असं करणं म्हणजे अप्रति÷sचं-बिलो डिग्निटीचं काम! आपण जरी ब्रिटिशांकडून लोकशाही घेतली असली तरी लोकप्रतिनिधी हा लोकसेवक नसतो तर त्यांचा मालक असतो हे आपण आचरत असलेले नवे तत्त्वज्ञान त्यांच्या बहुधा गावीही नसावं. पुन्हा जीव वाचावा म्हणून ओठात ओठ घालून श्वास देणं म्हणजे अतीच झालं…! ब्रिटनचा हा खासदार एका पोलीस कर्मचाऱयाच्या मदतीसाठी धावला कारण, तो पूर्वी सैन्यात असताना त्यानं बोनिस्थासारख्या सतत युद्धछायेतल्या अशांत देशात नागरी संरक्षणाचं काम केलं होतं. 2012 च्या बाली बॉम्बच्या अतिरेकी हल्ल्यात त्याचा बंधू मारला गेला होता. अतिरेकी व दहशतवादी हल्ल्यात सामान्य माणसे कशी हकनाक मारली जातात हे त्यानं पाहिलं व अनुभवलं होतं. पुन्हा तो माणुसकीवर श्रद्धा ठेवणारा म्हणून सर्वच मानवी जीव समान मानणारा होता. म्हणून उत्स्फूर्तपणे जीवाची पर्वा न करता तो कीथ पामरच्या रक्षणासाठी धावला. त्याच्या मते हे त्याचं कर्तव्य होतं, ते केलं म्हणून संसदेत बोलून प्रशंसा व प्रसिद्धी मिळवणं त्याला एक सच्चा माणूस व सच्चा जनसेवक (होय, संसद सदस्य हा लोकशाहीमध्ये लोकसेवकच असतो.) म्हणून कमीपणाचं माणुसकीला सोडून वाटत होतं!लोकप्रतिनिधी व जीवनाच्या विविध क्षेत्रातील उच्चपदस्थांकडून विनयशीलता व सौजन्य अपेक्षित असतं. त्यांनी सामान्य माणसाला प्रेमानं व प्रति÷sनं वागवणं, प्रसंगी मदतीचा हात देणं हे सुसंस्कृत माणुसकीची आद्य अट असते. पण आपल्या खासदारानं स्वतःला खास समजत दिल्ली विमानतळावर काम करणाऱया साठ वर्षाच्या डय़ुटी ऑफिसरला चपलेनं पंचवीस वेळा मारणं व ते अभिमानानं सांगणं, त्याबद्दल पश्चाताप न वाटणं या पार्श्वभूमीवर इलवूड यांचं खासदार म्हणून होणारं दर्शन माणुसकी धन्य करणारं आहे! लोकप्रतिनिधींच्या विमानप्रवासाच्या संदर्भात मला एअर इंडियाचे चेअरमन असलेल्या जे. आर. डी. टाटांची एक हकिकत आठवते, माणुसकी, सौजन्य व विनयशीलता आणि उच्चपदस्थ असूनही साधेपणा व कर्मचाऱयांना समानतेनं वागणं या भारतात आज दुर्मीळ होत चाललेल्या गुणांचे ते एक आदर्श उदाहरण आहे!एकदा ते मुंबई विमानतळावर कलकत्त्याला जाण्यासाठी आले होते. ते बोर्डिंग पास घेणार तोवर एक माणूस तिथं आला. त्याला आई आजारी असल्यामुळे तातडीनं कलकत्त्याला जाणं आवश्यक होतं. तेव्हा जे. आर. डी. टाटांनी आपल्याऐवजी त्याला तिकीट द्यायला सांगितलं. तिथल्या कर्मचाऱयांनी त्याचं कारण विचारलं असता ते म्हणाले, ‘मी ज्या कंपनीचा चेअरमन आहे, त्या कंपनीचं उद्दिष्ट ग्राहक सेवा आहे. त्या माणसाला तातडी होती व मला नंतरच्या फ्लाईटनं जाणं चालण्यासारखं होतं. शिवाय मी कंपनीचा चेअरमन असल्यामुळे मला तिकीट मोफत आहे, पण तो पैसे भरणार होता. तेव्हा गरजूंना प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे, हे तुम्हीही लक्षात ठेवा.’

वाचकहो, जरा कल्पना करा, तुम्हाला तातडीनं जायचं आहे व तुम्ही खासदार वा उच्च अधिकाऱयांना त्याचं तिकीट देण्याची विनंती करत आहात… तुम्हाला त्यांच्यात कुणी जे. आर. डी. टाटा सापडेल? शक्मय नाही. एवढी परिस्थिती बदललेली नाही. आपले लोकप्रतिनिधी व आपल्या करातून ज्यांना पगार मिळतो ते नोकरशहा, तुमचे आमचे ‘जनसेवक’ राहिले नाहीत…. ते आपले मालक झाले आहेत व आपण त्यांचे असे शिवीगाळ, मारहाण इत्यादी अत्याचार निमूटपणे सहन करत आहोत… ब्रिटनमध्ये लिखित घटना नाही, पण तेथील संसदीय लोकशाही ही संकेत, परंपरा आणि अलिखित नैतिक नियमांवर चालते. तेथील लोकप्रतिनिधी आजही स्वतःला लोकसेवक समजतात व संसद सदस्य म्हणून कोणतेही विशेष अधिकार व मानमरातब मागत नाहीत. तेथे खासदार व सामान्य कर्मचारी दोघांनाही समान वागवलं जातं. याचं ताजं उदाहरण म्हणजे ब्रिटनच्या संसदेच्या संरक्षक भिंतीवर कीथ पामर या सामान्य पोलीस कर्मचाऱयाचे स्मारक मागच्या वषी ब्रेक्झीट मोहिमेच्या वेळी मारले गेलेल्या मजूरपक्षाचे खासदार जो कोक्स यांच्या बाजूला बांधण्याचा संसदेनं निर्णय घेतला आहे… ही खरी लोकशाही, ही खरी समता. ब्रिटनमध्ये लोकशाही म्हणजे खरोखरच लोकांचे लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेले राज्य आहे. आपण भारतीय लोकशाहीबद्दल असं म्हणू शकतो का? आपल्या लोकप्रतिनिधींना त्याची जाणीव तरी आहे का?

Related posts: