|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » गौरव भाटिया यांचाअखेर भाजपमध्ये प्रवेश

गौरव भाटिया यांचाअखेर भाजपमध्ये प्रवेश 

नवी दिल्ली :

 समाजवादी पक्षाचे माजी नेते गौरव भाटिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाटिया यांनी दिल्लीस्थित भाजप मुख्यालयात रविवारी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. त्यांनी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी सप प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता. गौरव भाटिया हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रख्यात वकील असून उत्तरप्रदेशचे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पक्षात होणाऱया दुर्लक्षामुळे त्यांनी सप सोडण्याचा निर्णय घेतला होता. सपतील अंतर्गत कलहावेळी त्यांनी अखिलेश गटाची बाजू उचलून धरली होती. गौरव भाटिया हे सपचे माजी अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांचे सहकारी आणि माजी महाधिवक्ता तसेच माजी खासदार दिवंगत विरेंद्र भाटिया यांचे पुत्र आहेत.

 

Related posts: