|Sunday, April 21, 2019
You are here: Home » क्रिडा » मियामी ओपन स्पर्धेत जोहाना कोंटाला जेतेपद

मियामी ओपन स्पर्धेत जोहाना कोंटाला जेतेपद 

वृत्तसंस्था/ मियामी सिटी

येथे झालेल्या मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या जोहाना कोंटाने अंतिम लढतीत डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझ्नियाकीला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, कोंटाचे मियामी स्पर्धेतील हे पहिलेच जेतेपद आहे.

शनिवारी रात्री उशिरा झालेल्या महिला एकेरीतील अंतिम लढतीत 10 व्या मानांकित कोंटाने 12 व्या मानांकित वोझ्नियाकीला 6-4, 6-3 असे नमवताना जेतेपद मिळवले. 25 वर्षीय कोंटाने प्रारंभापासून आक्रमक खेळताना वोझ्नियाकीला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. पहिल्या सेटमध्ये वोझ्नियाकीला तिला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, पण कोंटाने हा गेम 6-4 असा जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर, दुसरा सेटही 6-3 असा जिंकत कोंटाने अवघ्या 52 मिनिटांत जेतेपद पटकावले. उपांत्य लढतीत कोंटाने अमेरिकन व्हिनस विल्यम्सला पराभूत करत या अंतिम फेरी गाठली होती.

Related posts: