|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » कॅनॉल रस्त्याची दुरावस्था – डांबरीकरणाची मागणी

कॅनॉल रस्त्याची दुरावस्था – डांबरीकरणाची मागणी 

वार्ताहर / सिध्दनेर्ली

पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील पिंपळगाव फाटा ते पाटील कुरुंदवाडे वस्तीपासून कॅनॉलला जोडणाऱया मार्गाची मोठय़ा प्रमाणात दुरावस्था झाली असून हा मार्ग डांबरीकरण करण्याबाबत पिंपळगावमधील नागरिकांनी कागल पंचायत समितीचे नूतन उपसभापती रमेश तोडकर यांना निवेदन दिले.

पिंपळगाव येथील अनेक शेतकऱयांच्या शेतजमिनी तसेच दोन-तीन वस्त्या कॅनॉलशेजारी आहेत. त्या वस्त्यांकडे जाणारा मार्ग बऱयाच वर्षापूर्वी खडीकरण केला होता. सततच्या वर्दळीमुळे या रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुर्दशा झाली असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. याची त्वरित दखल घेवून रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी पिंपळगाव खुर्दचे     ग्रामस्थ उपस्थित होते.