|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दुष्काळी माणची टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल

दुष्काळी माणची टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल 

लालासाहेब दडस / दहिवडी

मनात आणल आणि मनापासुन एखादी गोष्ट केली तर अशक्य ही शक्य होत अशीच किमया माण तालुक्यात झाली असून जलयुक्त शिवार पाणलोट या अभियानामुळे माणची दुष्काळ आणि टँकर मुक्तीकडे वाटचाल सुरु असून सध्या तालुक्यात शासकीय सोळा टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून गेल्या काही वर्षात डिसेंबर महिन्यात टँकर सुरु करायला लागायचे सध्या सुरु असणाऱया टँकरवरुन दुष्काळ मुक्तीचीच जाणीव होत आहे. 

सततचा दुष्काळी त्रास सहन करत इथली जनता उनाचे चटके सहन करत आपली गुजरान करत आहे. मात्र शासनाच्या काही अभियानामुळे इथले चित्रच पालटुन गेले आहे. माण तालुक्यात गेल्या वर्षी सुमारे बेचाळीस टँकरद्वारे दुष्काळी भागात पाणी पुरवठा करण्यात येत होता डिसेंबर महिना सुरु झाला. कार्यालयात अनेक गावतील अर्ज टँकरसाठी रोज यायचे, अशी परिस्थिती होती कायमस्वरुपी पाणी स्त्राsत उपलब्ध करणे. हिच यावर उपाय योजना होती. सध्या मात्र टँकरची आकडेवारी कमी होऊन फक्त सोळावर आल्याने माण तालुक्यात ह्या अभियानाचा चांगलाच फायदा झाल्याच दिसत आहे.

गेल्या दोन वर्षापासून बहुतांश गावात जलयुक्त शिवार आणि पाणलोट या अभियानांतर्गत अनेक गावातील ओढे नाले तलाव नदी बंधारे यांच्यामध्ये असणारा गाळ काढणे, त्यांचे खोलीकरण रुंदीकरण करुन त्याचा आकार वाढवणे यामुळे पुर्वी होणाऱया पाणी साठय़ापेक्षा जास्त पाणी साठण्यास मदत होत आहे त्याच बरोबर त्याच्या आजूबाजूला खोल चरींच्या माध्यमातून पाण्याचा प्रवाह अडवण्याचे काम करणे या खोलीमुळे लांबुन पाण्याबरोबर आलेला गाळ थेट बंधाऱयात न जाता त्या सलग समतल चरीमध्ये अडकून राहतो. माण तालुक्यात सिमेट बंधाऱयाची कामे मोठय़ा प्रमाणात झाल्याने पाण्याची साठवण करण्यास साधन झाल यामुळे पाणी साठय़ात वाढ होवुन त्याच परिसरात असणाऱया विहिरी बोअरवेल यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होण्यास मदत झाली.

गेल्या वर्षी माण तालुक्याच्या अनेक भागात पाऊस पडला त्या ठिकाणी पाणी साठा झाला. मात्र जो भाग पावसापासून वंचित राहिला तिथे मात्र पाण्याची गरज मोठय़ा प्रमाणात भासली आणि त्याठिकाणी असणारी कामे कोरडीच राहिली. अनेक शेतकऱयांनी पाण्याचे महत्त्व ओळखून लोकाभिमुख कामाला कोणताही अडथळा न आणता कामे पूर्ण करुन घेतली. यामध्ये प्रामुख्याने आपली मानसिकताच शेतकऱयानी बदलली व याचा फायदा पाण्याच्या माध्यमातून झाला.

माण तालुक्याचे सुपुत्र प्रभाकर देशमुख आणि माणमध्ये कार्यरत असणारे तत्कालीन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार सुरेखा माने, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आणि त्यांचे इतर कर्मचारी व सत्यमेव जयते वॉटर कपचे समनवयक अजित पवार, डॉ प्रदीप पोळ यांनी स्वतः व अधिकाऱयांनी लोकांच्या मानसिकतेत बदल करुन लोकसहभागातून आपल्याला ही कामे कशी चांगल्या पध्दतीने करता येतील याचे महत्त्व पठवुन दिले.

लोकाना हि या अभियानाचे फायदे पटले मग लोकानीच प्रत्येक गावात जनजागृती, मेळावे, ग्रामसभा व शिवारफेरी याद्वारे इतराना यात सामावुन घेत मुंबईकर मंडळींकडून मदत घेत अभियानात सहभागी होऊन आपले गाव पाण्यान तरी स्वयंपूर्ण करु, अशी शपथ घेतली.

ही कामे पूर्ण केली त्यानंतर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ओढे नाले बंधारे वगळी यात चांगला पाणीसाठा झाल्याने माणदेशी जनतेच्या चेहऱयावर आनंद चमकू लागला व अभियानामुळे हा फायदा झाला.