|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » सिरियात रासायनिक हल्ला, 11 चिमुरडय़ांसह 100 जणांचा मृत्यू

सिरियात रासायनिक हल्ला, 11 चिमुरडय़ांसह 100 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सिरियाच्या वायव्येकडील ईदबिल प्रांतात मंगळवारी रासायनिक गॅस हल्ला करण्यात आला. यात 58 ठार झाले तर मृतांमध्ये 11 मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर 300 पेक्षा अधिक लोक आजारी आहेत. स्थानिक सूत्रांच्या दाव्या नुसार यात 100 जणांचा बळी गेल्याचे समजते.

सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर हय़ुमन राइट्सने दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या खान शेखौन शहरात झाला. रशिया आणि सिरिया फौजांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. गुदमरल्यामुळे अनेक लोन बेशुद्ध पडले. सिरिया सरकारने रासायनिक वायू हल्ल्यांचे नेहमीच खंडन केले आहे. वैद्यकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसाल, विषारी वायूने लोक ग्रस्त आहेत. श्वसनाचा त्यांना त्रास होत आहे. अनेक जण श्वास घेता येत नसल्याने बशुद्धवस्थेत पडले आहेत.