|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बहुग्राम पिण्याच्या पाणी योजना एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण

बहुग्राम पिण्याच्या पाणी योजना एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण 

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव जिल्हा पंचायत विभागामध्ये येणाऱया नऊ आणि चिकोडी विभागात येणाऱया तीन बहुग्राम पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू आहेत. या योजना एप्रिलच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास राज्याचे ग्रामीण विकासमंत्री एच. के. पाटील यांनी व्यक्त केला.

बेळगाव जिल्हय़ात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीचा तसेच पिण्याच्या पाणी योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जि. पं. सभागृहात बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी ग्रामीण विकासमंत्री एच. के. पाटील बोलत होते.

ते पुढे म्हणाले, बेळगाव जिल्हय़ात एकूण 35 बहुग्राम पिण्याच्या पाणी योजना सुरू आहेत. त्यातील 28 योजना येत्या एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होतील आणि उर्वरित 7 डिसेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात, असा आदेश अधिकाऱयांना दिला आहे.

जिल्हय़ात सध्या मोठय़ा प्रमाणात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच दुष्काळी भागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये, यासाठी अधिकाऱयांनी बाराही महिने प्रामाणिकपणे काम करावे आणि यापुढे येणाऱया समस्येवर योग्य तोडगा काढावा, अशी सूचना एच. के. पाटील यांनी केली आहे. बैठकीला खा. प्रकाश हुक्केरी, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे आदी उपस्थित होते.