|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ऐतिहासिक पोखरण तलाव 12 ते 15 फुट बुजविण्याचे काम सुरू

ऐतिहासिक पोखरण तलाव 12 ते 15 फुट बुजविण्याचे काम सुरू 

कल्याण / प्रतिनिधी

ऐतिहासिक कल्याणच्या पाऊल खुणा जपणाऱया पोखरण तलावाची भिंत ढासळल्याने तलावाच्या काठावर उभारण्यात आलेल्या चार मजली दोन इमारतीना धोका निर्माण झाला आहे. आता या इमारतीचा वाचवण्यासाठी पोखरण जवळपास 12 ते 15 फूट बुजविण्याचे काम वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाकडूनच हा निर्णय घेत इमारतीच्या सुरक्षेसाठी पोखरणचा विस्तार कमी करण्याचा घाट घालण्यात आला आहे

कल्याणचा ऐतिहासिक वारसा जपणाऱया पोखरण तलावाची जागा बिल्डरांच्या घशा’ दर्जाचे पर्यटन स्थळ घोषित करून राज्य शासनच्या पर्यटन विभागाकडील देवस्थान विकास निधीतून या तलाव क्षेत्राचा विकास करण्याची मागणी कल्याण पश्चिम विधानसभेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केली होती. याबाबत पालकमंर्त्यांनी मंजुरी देत याबाबतचे सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महानग पालिकेला दिले होते. मात्र सत्ताधिकाऱयांनी श्रेयाच्या राजकारणासाठी या तलावाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास विरोध केला होता. उर्वरित जागेवर संकुले उभारण्यास परवानगी मिळू शकणार नसल्यामुळे या भागाचा विकास खुंटेल, असे मत प्रदर्शित करत या तलावाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला होता. यानंतर पाणी नसलेल्या या तलावातील गाळ महापालिकेच्या निधीतून 25 लाख रुपये खर्चून काढण्यात आला. मात्र, तरीही आजूबाजूच्या इमारतीसाठी झालेल्या पायाभरणीमुळे या तलावाचे नैसर्गिक झरे बुजले असून पावसाळा संपताच हि पोखरण कोरडी पडते.

या तलावाचा वापर परीक्षा संपल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील मुले  खेळण्यासाठी करतात. मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे सप्टेबर महिन्यात  पोखरणन्ची संरक्षण भिंत ढासळल्यामुळे तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या दोन्ही इमार्तीना धोका निर्माण झाला होता. पालिकेने या दोन्ही इमारटीना नोटीसा दिल्या होत्या. यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटरने दिलेल्या अहवालात इमारत सुरक्षित असून केवळ तलावाची सरक्षण भिंतीची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचा अभिप्राय दिला होता. यामुळे आता या इमारतीचा बचाव करण्यासाठी पोखरणाचा विस्तार कमी करण्याचा घाट घालण्यात आला आहे. या इमारतीच्या संरक्षनासाठी पोखरण तब्बल 12 ते 15 फूटाने कमी करत पोखरणमध्ये भराव टाकून या इमारतीला आधार देणारी भक्कम भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे आता या इमारतीचा बचाव करण्यासाठी पोखरणचा विस्तार कमी करण्याचा घाट घालण्यात आला आहे.

या इमारतीच्या संरक्षणासाठी पालिक प्रशासनाकडून पोखरण तब्बल 12 ते 15 फूटाने कमी करत पोखरणमध्ये भराव टाकून या इमारतीला आधार देणारी भक्कम भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. याबाबत पालिकेचे कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांनी इमारतीमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासनाने सरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू केले असून यामुळे या इमारतीची सुरक्षा होऊ शकणार आहे. यामुळेच पोखर्णीचा आकार काही कमी करून ही रुंद भिंत उभारली जात असल्याचे सांगितले.

Related posts: