|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात महाडीक, जगताप यांचे प्रयोग प्रथम

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात महाडीक, जगताप यांचे प्रयोग प्रथम 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

पेठनाका (ता.वाळवा, जि.सांगली) येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात इयत्ता सहावी ते आठवी या प्राथमिक विद्यार्थी गटात रत्नागिरी जिल्हय़ातील साडवलीच्या मिनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थींनी समृध्दी दिलीप महाडीक हिने प्रथम क्रमांक मिळवला. तर नववी ते बारावी माध्यमिक गटातील प्रथम पारितोषिक कासेगावच्या आझाद विद्यालयाच्या ओंकार संपतराव जगताप या विद्यार्थ्यांने मिळवला. दरम्यान लोकसंख्या शिक्षण साहित्य प्रदर्शनाचेही पारितोषिक वितरण करण्यात आले.

महाराष्ट्र शासन व येथील व्यंकेटश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडीक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. बुधवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले होते. शनिवारी खा.धनंजय महाडीक यांच्या हस्ते व आ.शिवाजीराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

प्राथमिक गटातील विजेते व कंसात त्यांचे प्रयोग असे- समृध्दी महाडीक (पॅडस ऑन फायर), व्दितीय क्रमांक नाजड महाविष्णू, आदर्श विद्यालय चेंबुर-मुंबई (झाडावर चढणारे रोबोट), तृतीय क्रमांक- सानिया सय्यद, दत्तात्रय हरी चव्हाण कन्या विद्यालय सांगलीवाडी (शेंगा फोडणे यंत्र), चौथा क्रमांक- ज्ञानेश्वरी देसाई, सरस्वती विद्यामंदीर पाचल-रत्नागिरी,(झेंडूच्या शेतीची यशस्वीता-मुल्यावर्धीत उत्पादने). अदिवासी गट प्रथम क्रमांक- वैष्णवी बांगरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेकलीखींडवाडा, जि.चंद्रपुर(नैसर्गिक वन औषधापासून अगरबत्ती व दंतमंजन)

माध्यमिक गट विजेते व कंसात प्रयोग असे- प्रथम क्रमांक- ओंकार जगताप, आझाद विद्यालय कासेगाव, जि.सांगली., व्दितीय क्रमांक- †िहब्बा मुल्ला, अलमोमिना स्कुल मुंबई. तृतीय क्रमांक- अमेय जोग, वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालय मुलुंड, चौथा क्रमांक- धृतील प्रजापत, एम.डी.एम.वाय हायस्कुल नंदुरबार. अदिवासी गट प्रथम क्रमांक- शिल्पा घोडाम, डॉ.शामप्रकाश मुखर्जी विद्यालय धोटी, जि.यवतमाळ,

लोकसंख्या शिक्षण साहित्य प्रदर्शन पारितोषिक प्राप्त साधने- प्राथमिक शिक्षक – संध्या राऊत, जिल्हा परिषद शाळा उथोली.जि.पुणे, (ज्ञान रचनावादी पध्दतीतून लोकसंख्या शिक्षण), व्दितीय क्रमांक- शालीग्राम निकम, जिल्हा परिषद शाळा, तळणी, जि.जळगाव.(लोकसंख्या नियंत्रण पर्यावरणीय गरज), तृतीय क्रमांक- संजय येशी, जि.प.शाळा धोंडेगाल जि.नाशिक.(लेक वाचवा, देश वाचवा). माध्यमिक गट

प्रथम क्रमांक- संदेश पांचाळ, बालमोहन विद्यामंदीर शिवाजीपार्क मुंबई (उजाडलं पण सुर्य कुठे आहे), व्दितीय क्रमांक – संदेश राऊत, न्यु इंग्लिश स्कुल टाळसुरे जि.रत्नागिरी (अनोखे ज्ञान) तृतीय क्रमांक – श्रीराम लोहार, न्यु इंग्लिश स्कुल कवडदारा, जि.नाशिक,(ज्ञानरचना वादीची कमाल लोकसंख्या शिक्षण).

  प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व पारितोषिक प्राप्त शैक्षणिक साहित्य– प्रथम क्रमांक – प्रमोद हुडगे, जि.प.शाळा नळेगाव जि.लातुर (ज्ञानरचनावादी जमा) व्दितीय क्रमांक – संतोष गावंड, जि.प.शाळा मांडला, जि.रायगड, ( मिनी तारांगण व इतर सर्व विषयाचे बहुउद्देशीय साहित्य).

 माध्यामिक शिक्षकांचे पारितोषिक प्राप्त साहित्य – प्रथम क्रमांक – सुरेशकुमार भागवत, चंद्रपुर (मोबाईल मॅथेमॅटीकल लॅबरोटरी) व्दितीय क्रमांक – प्रिती बेंद्रे, बालमोहन विद्यामंदीर शिवाजीपार्क मुंबई ( संवेदना). प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर यांचे प्रयोगीक साधनांचे प्रदर्शन, पारितोषिक प्राप्त साधने – प्रथम क्रमांक – रघुनाथ आडीवरेकर, श्री महाकाली इंग्लिश स्कुल आडीवरे, जि.रत्नागिरी,(मनोरंजनातून विज्ञान). व्दितीय क्रमांक- कैलास नांद्रे, माध्यमिक आश्रमशाळा, सरवाणी, जि.नंदुरबार,(प्रकाश किरणांचे रहस्य) या प्रदर्शनात चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरी जिह्याने मिळवली.

  या पारितोषिकांचे वितरण खा.महाडीक यांच्या हस्ते व आ.नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ राजेंद्र शेंडे, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, आचल जडे, माजी.आ.भगवानराव साळुंखे, व्यंकेटश्वरा संस्थेचे सचिव राहुल महाडीक, सम्राट महाडीक, प्रा.महेश जोशी यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Related posts: