|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » धूम टोळीकडून महिलेची सोन्याची चेन लंपास

धूम टोळीकडून महिलेची सोन्याची चेन लंपास 

प्रतिनिधी/ सांगली

येथील गव्हर्मेट कॉलनीतील मारूती मंदिरापासून चालत निघालेल्या एका साठ वर्षीय महिलेच्या गळय़ातील साडेचार तोळय़ाची सोन्याची चेन चोरटय़ांनी पळवली. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गव्हर्मेट कॉलनी मारूती मंदिराजवळ ही  घटना घडली असून श्रीमती विमल सदानंत सुतार वय 60 रा. मारूती मंदिरापाठीमागे गव्हर्मेट कॉलनी यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, सोमवारी सायंकाळी श्रीमती सुतार या मारूती मंदिरापासून रस्त्याने निघाल्या होत्या. त्याचवेळी दुचाकीरून पाठीमागून दोन युवक आले.पाठीमागे बसलेल्या युवकाने त्यांच्या गळय़ातील चेन हिसडा मारून घेतली. वाऱयाच्या वेगाने दोघांनीही पोबारा केला. श्रीमती सुतार यांनी आरडाओरड केली. पण, दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. रात्री उशीरा विश्रामबाग पोलिसांनी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरटय़ांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts: