|Sunday, September 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वीज पडून 50 बकरी दगावली

वीज पडून 50 बकरी दगावली 

वार्ताहर/ निपाणी

शिमोगा जिह्यातील सोरब तालुका कार्यक्षेत्रातील ज्वालदगुड्डी या गावात मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजता वीज पडून 50 बकरी ठार झाल्याची घटना घडली. यामध्ये गायकवाडी (ता. चिकोडी) येथील तानाजी मनगेणी यमगर व जोतिबा बिरु शेंडगे या दोन मेंढपाळांचे सुमारे 6 लाखाचे नुकसान झाले.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, तानाजी मनगेणी यमगर व जोतिबा बिरु शेंडगे हे दोघे मेंढपाळ गायकवाडी येथील रहिवासी आहेत. या दोघांची 300 बकरी आहेत. फिरस्ती करताना हे दोघे मेंढपाळ प्रतिवर्षाप्रमाणे शिमोगा जिह्यातील ज्वालदगुड्डी या गावात गेले होते. मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजता उष्म्यात अचानक वाढ होताना वळिवाचा पाऊस होण्याची स्थिती निर्माण झाली. यामध्ये ढगांचा गडगडाट व विजेचा कडकडाट सुरु झाला. निर्माण झालेल्या या वातावरणात वीज पडल्याने तानाजी यमगर व जोतिबा शेंडगे या दोघांची 50 बकरी दगावली.

घटनास्थळी 300 बकरी होती. वीज पडलेल्या ठिकाणी असलेल्या परिसरात 50 बकरी होती. हीच बकरी या घटनेत दगावली. या दुर्दैवी घटनेमुळे फिरस्तीवर गेलेल्या मेंढपाळांवर 6 लाखाच्या नुकसानाचा बोजा पडला. या घटनेची नोंद तेथील स्थानिक पोलिसात जोतिबा शेंडगे यांनी दिली आहे. या घटनेचे वृत्त गायकवाडीत समजताच समस्त धनगर समाजामध्ये दुःखाचे वातावरण पसरले असून घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नुकसानग्रस्त मेंढपाळांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. आणि मेंढपाळांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यक्त होत होती.

Related posts: