|Saturday, January 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » जिओची ग्राहकांसाठी ‘धन धना धन’ ऑफर

जिओची ग्राहकांसाठी ‘धन धना धन’ ऑफर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ट्रायच्या आदेशानंतर रिलायन्स जिओने समर सरप्राईज ऑफर मागे घेतली. मात्र, ‘धन धना धन’ नावाची समर सरप्राईजसारखीच नवी ऑफर लॉन्च केली आहे. समर सरप्राईज ऑफरचा ज्यांना लाभ घेता आला नाही, त्यांच्यासाठी ख्घस जिओने ही ऑफर आणली आहे. ज्यांनी समर सरप्राईच ऑफर घेतली आहे, ते यूजर्स मात्र ही ऑफर घेऊ शकणार नाही.

‘धन धना धन’ ऑफर दोन वेगवेगळय़ात प्रकारात विभागली आहे. जे आधीपासूनच जिओचे प्राईम मेंबर आहेत. त्यांच्यासाठी वेगळा रिचार्ज्ह आणि जो प्राईम मेंबर नाहीत किंवा नव्याने केले आहेत, त्यांच्यासाठी वेगळा रिजार्च आहे. जिओ प्राईम मेंबरना धन धना धन ऑफरमधील 309रूपयांच्या तीन महिन्यांसाठी दररोज 1 जीबी 4जी डेटा तर 509 रूपयांच्या रिजार्चमध्ये तीन महिन्यांसाठी दररोज 2 जीबी 4जी डेटा, तर 509 रूपयांच्या रिजार्चमध्ये तीन महिन्यांसाठी दररोज 2 जीबी 4जीबी डेटा मिळेल. या दोन्ही रिचार्जवर तीन महिन्यांसाठी मोफत व्हॉईस कॉलिंग, अनलिमिटेड एसएमएस, जिओ ऍप्स या सुविधाही मिळतील. मोफत डेटा लिमिट संपल्यानंतर नेट स्पीड 128 kbps होइल.

Related posts: