|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळी विमानतळावर 17 लाखांचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर 17 लाखांचे सोने जप्त 

दोन्ही प्रवासी भटकळ येथील कस्टम विभागाची कारवाई

प्रतिनिधी / वास्को

दाबोळी विमानतळावर उतरलेल्या दोघा हवाई प्रवाशांकडून 17 लाख रूपये किंमतीचे 636 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. हे दोघेही प्रवासी कर्नाटकातील भटकळ शहरातील असून ते वेगवेगळय़ा विमानाने बुधवारी सकाळी गोव्यात उतरले होते.

हवाईमार्गे सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी कारवाईसाठी पाळत ठेवली होती. पहिला प्रवासी दोहा कतारहून दुबईमार्गे कतार एअरवेजच्या विमानातून दाबोळी विमानतळावर उतरला. त्याची तपासणी केली असता 374 ग्रॅम वजनाचे (दहा लाख रूपये) सोने आढळून आले. हे सोने दागिन्यांच्या तसेच कच्च्या स्वरूपात होते. तव्याचे हॅन्डल व बॅगांमध्ये त्याने हे सोने लपवले होते.

सात दिवसांतील तिसरी कारवाई

दुसऱया घटनेत एका प्रवाशाकडून कस्टम अधिकाऱयांनी 262 ग्रॅम वजनाचे (7 लाख रूपये) सोने जप्त केले. हा प्रवासी दुबईहून एअर इंडियाच्या विमानाने दाबोळी विमानतळावर उतरला होता. त्यानेही तव्याच्या हॅण्डलमध्ये लपवून सोन्याची तस्करी केली होती. गेल्या सात दिवसात कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावर पेलेली ही तिसरी कारवाई आहे. गत आठवडय़ात कस्टमने एका केरळी प्रवाशाकडून 161 ग्रॅम सोने जप्त केले होते. त्याने पावडर स्वरूपातील सोने पावडर स्वरूपातील दुधामध्ये मिश्रित करून आणले होते.

कस्टम अधिकाऱयांनी ही कारवाई केली असली तरी तस्करीत गुंतलेल्यांना अटक केलेली नाही. जप्त करण्यात आलेले एकूण सोने 20 लाखांपेक्षा कमी मुल्याचे असल्याने चौकशी आणि इतर सोपस्कर करून कस्टम कायद्यानुसार त्या प्रवाशांना मुक्त केले. साहाय्यक कस्टम आयुक्त गौरवकुमार जैन यांच्या देखरेखीखाली व कस्टमचे गोवा विभाग आयुक्त के. अनपाझाकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Related posts: