|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पश्चिम रेल्वेच्या चा लोकल प्रवास 150 वर्षांचा

पश्चिम रेल्वेच्या चा लोकल प्रवास 150 वर्षांचा 

मुंबई उपनगरीय पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला बुधवारी 150 वर्षे पूर्ण झाली. 12 एप्रिल 1867 रोजी विरार ते बॅक बे ही पहिली लोकल गाडी धावली होती. त्या आधी 14 वर्षे बोरिबंदर ते ठाणे यादरम्यान धावलेली देशातील पहिली गाडी ही लोकलसेवा धावली असून 1865च्या फेब्रुवारीत पहिल्यांदा लोकलसेवेचा उल्लेख करण्यात आला.

देशातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 मध्ये बोरिबंदर ते ठाणेदरम्यान धावली. 1 फेब्रुवारी 1865 पासून रेल्वेच्या वेळापत्रकात लोकल गाडय़ांचा समावेश झाला आणि त्यापैकी पहिली गाडी 12 एप्रिल 1867 रोजी विरारहून पहाटे 6.45 वाजता बॅकबे स्थानकाच्या दिशेने रवाना झाली. त्यावेळी हे स्थानक सध्याच्या चर्निरोड आणि ग्रँटरोड या स्थानकांदरम्यान होते. हळूहळू वेळापत्रकात बदल होत पूर्वी 6.45 वाजता सुटणारी ही गाडी आता 6.53 वाजता चर्चगेटकडे रवाना होते. त्यावेळी दिवसभरात दोनच फेऱया असलेली ही गाडी बॅकबेवरून संध्याकाळी 5.30 वाजता सुटत होती. सहा डब्यांच्या या गाडीत महिलांसाठी दुसऱया श्रेणीचा वेगळा डबा होता. त्याचप्रमाणे धुम्रपान करणाऱया प्रवाशांसाठी कक्ष राखीव होता. या गाडीत त्या काळी तीन श्रेणी असून, सर्वाधिक प्रवासी दुसऱया श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत. त्यासाठी एका फेरीचे भाडे 7 पैसे एवढे होते. तिसऱया श्रेणीतून प्रवास करणाऱयांना 3 पैसे भाडे द्यावे लागत होते.

1867 मध्ये निघालेली ही पहिली गाडी नीला (नालासोपारा), बसिन (वसई), पाणजू (वसईच्या दोन खाडय़ांमधील स्थानक), बेरेवाला (बोरिवली), पहाडी (गोरेगाव), अंदारू (अंधेरी), सांताक्रुझ, बंदोरा (वांद्रे), माहीम, दादुरे (दादर) आणि ग्रँट रोड या स्थानकांवर थांबली होती. कालानुरूप या सहा डब्यांच्या गाडीत बदल होत गेले. नऊ, 12 आणि आता या मार्गावर 15 डब्यांची गाडीही धावू लागली आहे. त्याचप्रमाणे स्थानकांच्या संख्येतही चांगलीच वाढ झाली.

पश्चिम रेल्वेरील 150 वर्षाचा लोकल प्रवास

1) 12 एप्रिल 1867- विरार स्थानकातून बॅकबे स्थानकासाठी पहिली लोकल धावली.

2) 1892-1867 पासून पुढील 25 वर्षांमध्ये बीबी अँड सीआय कंपनीने चार विरार लोकल, एक बोरिवली लोकल आणि 27 वांद्रे लोकल अशा फेऱया वाढवल्या. पहिली जलद लोकल बॅकबे ते वांद्रेदरम्यान चालवण्यात आली.

3) 1925-वाफेवरच्या इंजिनाऐवजी विद्युत इंजिनाचा वापर सुरू झाला असून आता या मार्गावर दर दिवशी 1323 फेऱया धावत असून 35 लाख प्रवासी प्रवास करत आहेत.

Related posts: