|Friday, July 28, 2017
You are here: Home » मनोरंजन » सैराटफेम परश्याचा मेकओव्हर !सैराटफेम परश्याचा मेकओव्हर ! 

सैराटमध्ये चॉकलेटबॉय परश्या साकारल्यानंतर आकाश ठोसर आता महेश मांजरेकर दिग्दर्शित एफयू म्हणजेच ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या सिनेमामध्ये रॉकिंग आणि दोस्तीसाठी काय पण करायला तयार असणाऱया शहरी कॉलेज गोईंग युवकाची भूमिका करण्यास सज्ज झाला आहे.

बॉलीवूड सुपरस्टार आणि महेश मांजरेकरांचा खास दोस्त सलमान खानने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एफयूचे टीजर पोस्टर ट्विट केल्यापासून सिनेमाची स्टारकास्ट, त्यांच्या लूकबद्दल अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. पण, आता ऑफिशिअल पोस्टरमध्ये दिसणारा लूक बघता अभिनेता आकाश ठोसर आता अतिशय रॉकिंग अंदाजात आणि दमदार भूमिकेसह चाहत्यांच्या भेटीला येणार आहे हे दिसून येते. सैराटनंतर आकाश ठोसर याचा हा पहिलाच चित्रपट असून त्याचे हे नवीन पोस्टर सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहे. पोस्टरमधील स्टायलीश लूक मुळे आकाश ठोसरची तरुणींमध्ये चांगलीच क्रेझ निर्माण झाली आहे. महेश मांजरेकरांचा सिनेमा म्हणजे सिनेमाचा आशय, विषय आणि सादरीकरण या सगळय़ातच भव्यता आढळून येते. वि. वा. शिरवाडकरांच्या नटसम्राटचे शिवधनुष्य त्याच भव्यतेसह यशस्वीपणे पेलल्यानंतर मांजरेकर आता तरुणाईला भुरळ पाडणारा सिनेमा घेऊन येत आहेत याची खात्री एफयू या सिनेमाचे पोस्टर बघितल्यावर पटते. ताज्या दमाची स्टायलिश स्टारकास्ट असणारा एफयू हा चित्रपट लवकरच म्हणजेच 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!