|Saturday, January 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ज्याची त्याची टक्केवारी

ज्याची त्याची टक्केवारी 

टक्केवारी या शब्दाला अनेक पैलू आहेत. दहावी किंवा बारावीतल्या मुलामुलींच्या पालकांना अभिप्रेत असलेली टक्केवारी वेगळी. नगरसेवक आणि कंत्राटदार यांच्या शब्दकोशातली टक्केवारी निराळी आणि निवडणुकांचे निकाल लागल्यावर जिंकलेल्या आणि हरलेल्या पक्षांचे नेते आपल्याला सांगतात ती टक्केवारी सर्वात भारी. आपण आज तिच्यावरच बोलू.

पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष निवडून यायचा. मग विरोधक म्हणायचे की काँग्रेसला एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्क्मयाहून कमी मते मिळाली आहेत. देशातल्या निम्म्याहून जास्त जनतेला काँग्रेस नको आहे. त्यांना असं बोलल्याचं समाधान, वर्तमानपत्रांना ते छापल्याचा संतोष आणि सत्ताधाऱयांना दुर्लक्ष केल्याचा आनंद. परवाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप निवडून आला. त्यामुळे समाधान आणि आनंद घेणारी माणसे बदलली आहेत. बाकी सगळं जैसे थे आहे. ज्ञान दिल्याने वाढते असे म्हणतात. त्याच चालीवर टक्केवारी दिल्याने आणि घेतल्याने दोघांचा आनंद वाढत असणार. नगरसेवक आणि कंत्राटदार यांच्याबद्दल मी हे लिहिलेलं नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांकडे अन्य सनसनाटी बातमी नसली की ते राजकीय बातम्यांच्या शिळय़ा कढीला ऊत आणू शकतात. गेल्या आठवडय़ात पोट निवडणुका झाल्या. या निवडणुकीत विरोधी पार्टीचा विजय झाला तर तो सत्ताधारी पक्षाविरुद्धचा असंतोष असतो आणि  सरकारच्या मते तो स्थानिक प्रश्न असतो. कर्नाटकमध्ये दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकांत काँग्रेस जिंकली. त्यांचे प्रवक्ते सांगत असतील की शंभर टक्के विजय झाला. विजय झाला तर अर्थातच तो राहुलजींच्या नेतृत्वाचा विजय असतो. पराभव झाला तर ती नेतृत्वाची सामूहिक जबाबदारी असते. दिल्लीच्या राजौरी गार्डन मतदारसंघात भाजपचा विजय झाला आणि आपचा पराभव झाला. भाजपचे आधी तीन आमदार होते. ते चार झाले. म्हणजे त्यांचे सामर्थ्य तेहतीसहून अधिक टक्क्यांनी वाढले. आपचे आधी सदुसष्ट आमदार होते. ते आता सहासष्ट झाले. म्हणजे त्यांचे सामर्थ्य दीडपेक्षा कमी टक्क्मयांनी घसरले. एकाच घटनेची टक्केवारी अशी भाजप आणि आप या दोन्ही पक्षांना कशी खूश करून गेली ते पहा. काँग्रेस पक्ष देखील या टक्केवारीने खूष झाला असणार. कारण या निवडणुकीत त्यांचा उमेदवार दुसऱया क्रमांकावर होता. पण भाजपचा उमेदवार जिंकला आणि काँग्रेसचा पडला. आपचा तिसऱया क्रमांकावर राहिला. टक्केवारी ही अशी प्रत्येकाला खूष ठेवणारी आकडेमोड आहे, आहे की नाही.

Related posts: