|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जीवनशैलीत बदलाशिवाय आजार बरे होणे अशक्य

जीवनशैलीत बदलाशिवाय आजार बरे होणे अशक्य 

वार्ताहर / मालवण

 रोज प्रचंड तणाव, फक्त पैशाच्या मागे लागून शार्टकटने सुख मिळविण्याच्या मागे असल्याने हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या आजारांचे प्रमाण समाजात वाढले आहे. ट्रिटमेंट कुठल्याही पॅथीची असली, तरी माणसाने दैनंदिन जीवनशैली बदलल्याशिवाय कुठलेही आजार बरे होणार नाहीत, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ व शल्य चिकित्सक डॉ. जगदीश हिरेमठ यांनी येथे केले.

  डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब सिंधुदुर्गतर्फे येथील मामा वरेरकर नाटय़गृह येथे ‘सिंधुकॉन 2017’ वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. हिरेमठ बोलत होते. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, फॅटर्निटी क्लबचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय सावंत, डॉ. राहुल वालावलकर, सचिव डॉ. राहुल वझे, डॉ. अजित लिमये, डॉ. विवेक रेडकर, डॉ. शशिकांत झाटये, महिला परिषदेच्या कार्यकारी सचिव डॉ. मालविका झाटये, डॉ. लीना लिमये, डॉ. शुभांगी जोशी, डॉ. योगिनी वझे, डॉ. रुपाली वालावलकर, डॉ. पुष्पा माळी, डॉ. गार्गी ओरसकर, डॉ. स्तुता सोमवंशी, डॉ. मधुरा काटकर, डॉ. मेधा मुरकर, डॉ. चैताली करंगुटकर, डॉ. जॉयलिन नऱहोना, डॉ. सीमाली रेडकर, डॉ. स्वाती बागवे, डॉ. राजेश्वरी वझे, डॉ. हरिश परुळेकर, डॉ. मुरवणे, डॉ. अविनाश झाटये, डॉ. अमोल झाटये, डॉ. अच्युत सोमवंशी आदी उपस्थित होते.

  डॉ. जगदिश हिरेमठ म्हणाले, शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य होय. सध्याचे डॉक्टर्स हे फक्त शारीरिक आरोग्याला महत्व देतात. ट्रिटमेंट देताना रोग टाळणे व पुरावाजन्य वैद्यकीय शास्त्रावर खात्री करीत नाहीत. डॉक्टरांनी ती खात्री करणे आवश्यक आहे. खात्री केली गेली नाही, तर अंधश्रद्धा व धर्म याचा आधार घेऊन दिल्या जाणाऱया ट्रिटमेंटला प्रतिसाद देणार नाहीत. प्रत्येक रुग्णाने स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ दिलाच पाहिजे. फास्ट लाईफ, चुकीचा आहार म्हणजे भरपूर न्याहारी न घेता रात्री भरपूर जेवण घेणे आरोग्य शास्त्राच्या विरोधी आहे.

 डॉ. श्रीधर गणपती, डॉ. संतोष शिंदे, डॉ. सत्येंद्र ओझा, डॉ. निरंजन शहा, डॉ. चारुदत्त भागवत यांची व्याख्याने झाली. पहिल्या तासात पेशंटस गंभीर असल्यास त्याला ग्रामीण भागातील डॉक्टरांनी कोणत्या प्रकारची ट्रिटमेंट द्यावी, यासाठी डॉ. अलिमियाँ पारकर, श्रीधर गणपत्ये, डॉ. निरंजन शहा, डॉ. चारुदत्त भागवत, डॉ. मकरंद परुळेकर यांच्यासोबत डॉक्टरांचे एका तासाचे ‘गोल्डन अवर’ हे महत्त्वाचे सदर झाले. तिन्ही पॅथीच्या डॉक्टरांना एकत्रित करणारे डॉ. एन. एन. मसुरेकर यांचे ओरिएशन लेक्चर डॉ. हिरेमठ यांनी घेतले.

  कणकवली येथील प्रतिथयश स्त्राrरोगतज्ञ डॉ. सविता तायशेटे यांना डॉ. जगदिश हिरमेठ यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावंतवाडी आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. दीपक तुपकर व वेंगुर्ले होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी केळकर यांच्या मार्गदर्शनाने कॉलेजचे उदयोन्मुख डॉक्टर म्हणून निवडलेल्या विद्यार्थ्यांना यूएसव्हीच्या उपाध्यक्षा फरिदा हुसेन यांच्याकडून गौरविण्यात आले. फरिदा हुसेन यांनी जिल्हय़ासाठी वैद्यकीय चर्चासत्र घडवून आणण्यास आर्थिक मदत करण्याचे आाश्वासन दिले. फरिदा हुसेन यांचा सत्कार डॉ. सीमाली रेडकर यांनी केला. प्रास्ताविक डॉ. राहुल वालावलकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. लीना लिमये, डॉ. मालविका झाटये, डॉ. कल्पना मेहता यांनी केले. आभार डॉ. राहुल वझे यांनी मानले. चर्चासत्र यशस्वीतेसाठी कोकण असोसिएशनच्या डॉ. लीना लिमये व डॉ. मालविका झाटये व त्यांच्या 14 महिला सहकाऱयांनी विशेष प्रयत्न केले.