|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » विमानतळांवर अलर्ट जारी

विमानतळांवर अलर्ट जारी 

 

प्रतिनिधी/ मुंबई

इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण 1999 साली केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेतल्या होत्या. याचीच पुनरावृत्ती दहशतवाद्यांनी पुन्हा आखली आहे. मुंबईसह चेन्नई, हैदराबाद या शहरांतील विमानतळावरून विमान अपहरणाचा कट दहशतवादी संघटनांनी आखला आहे. एका महिलेने सुरक्षा यंत्रणांना ई-मेल करून या कटाची माहिती दिल्यामुळे मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद विमानतळांवर ‘हाय अलर्ट’चा इशारा दिला असून, चोख बंदोबस्त ठेवल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली.

विमानांचे अपहरण करण्याच्या या कटात 23 लोकांचा एक गट सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. या कटाची माहिती मिळताच तीनही विमानतळांसह देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गुप्तचर यंत्रणांना अपहरणाचा कट समजताच विमानतळ सुरक्षा समन्वय समितीने शनिवारी तातडीची बैठक घेतली. एका महिलेने सुरक्षा अधिकाऱयांना यासंबंधी ई-मेल पाठवला होता. या ईöमेलमध्ये महिलेने सहा तरुण मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद विमानतळांवरून एकाचवेळी विमानाचे अपहरण करण्याचा कट आखत असल्याचे ऐकले असल्याचा उल्लेख केला आहे. या कामात  23 जण सहभागी होणार असून एप्रिल महिन्याच्या मध्यात हा कट अंमलात आणला जाणार आहे, असाही उल्लेख केला होता.

विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी पेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) असल्याने त्यांनी लगेच विमानतळाअंतर्गत तसेच बाहेर चोख बंदोबस्त ठेवला आहे. या वृत्ताला सीआयएसएफचे महासंचालक ओ. पी. सिंह यांनी दुजोरा दिला दिल्यामुळे राज्य पोलिसांनीही फोर्स वनला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. राज्य एटीएस आणि क्राईम ब्रँचने संशयितांची धरपकड केली आहे. तसेच विमानतळावर गस्त वाढवण्यात आली असून प्रवेशद्वारावरही सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सीआयएसएफने सांगितले. हा कट नेमका कोणी आखला, ई-मेल पाठविणाऱया महिलेने हे नेमके कोठे ऐकले आहे? याचा तपास करण्याच्या दृष्टीने ई-मेल पाठविणाऱया महिलेचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे दहशतवाद्यांनी विमान अपहरणाचा कट कोणत्या उद्देशाने आखला आहे? याबाबत अद्याप कोणताही तर्क करता येत नसल्याचे तपास यंत्रणांतील अधिकाऱयांनी सांगितले.

24 डिसेंबर 1999 रोजी हरकत-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने नेपाळमधील काठमांडूहून निघालेले इंडियन एअरलाईन्सच्या आयसी 814 या विमानाचे अपहरण करून त्याबदल्यात मौलाना मसुद अझर, मुस्ताक अहमद झरगार आणि अहमद ओमर सईद शेख या दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली होती. यामुळे नेमका दहशतवाद्यांचा कट काय आहे? याचा अधिक तपास सुरू असून विमानतळांवरील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.