|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवकालीन ऐतिहासिक देखावे सादर करण्याचा निर्णय

शिवकालीन ऐतिहासिक देखावे सादर करण्याचा निर्णय 

प्रतिनिधी / बेळगाव

शिवजयंतीनिमित्त दि. 29 रोजी शिवचित्ररथ मिरवणूक काढण्याचे ठरविण्यात आले असून शिवकालीन आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ऐतिहासिक देखावे सादर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अनगोळ मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक मारुती मंदिर रघुनाथ पेठ येथे झाली. यावेळी शिवजयंतीबाबत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

शिवजयंती उत्सवानिमित्त दि. 28 रोजी सकाळी 10 वाजता संभाजी चौक व गांधी स्मारक अनगोळ येथे शिवाजी महाराज पुतळय़ाचे पूजन करण्याचे ठरविण्यात आले. दि. 29 रोजी सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजन करून शिवचित्ररथ मिरवणुकीचा प्रारंभ करण्याचे निश्चित करण्यात आले.

यावेळी बैठकीला बाळू पवार, राजू पवार, नगरसेवक विनायक गुंजटकर, बाबू रेडेकर, श्रीकांत कुऱयाळकर, महेश जाधव, भावेश बिर्जे, अमित शिंदोळकर, उमेश कुऱयाळकर, सचिन मांगले, बाबू लोहार, मोहन पवार, देवण आदींसह पंचमंडळी, शिवप्रेमी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: