|Sunday, August 25, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 4G VoLTE सह Videocon Delite 11+ लाँच

4G VoLTE सह Videocon Delite 11+ लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी व्हिडिओकॉनने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा बजट फोन ‘डिलाइट 11 प्लस’ नुकताच लाँच केला आहे. व्हिडिओकॉन डिलाइट 11 प्लसची किंमत 5 हजार 800 रुपये असणार आहे. हा नवा स्मार्टफोन स्पेस ग्रे कलर वेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5 इंच FWVGA

– कॅमेरा – 5 मेगापिक्सल

– पंट कॅमेरा – 2 मेगापिक्सल

– इंटरनल स्टोरेज – 8 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – 32 जीबीपर्यंत

– बॅटरी – 3000mAh

– अन्य फिचर्स – 4G VoLTE, GPS, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth v4.0, Micro-USB आणि FM