|Saturday, July 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विषय समिती सदस्य निवडीवरुन भाजपा- काँग्रेस सदस्यांमध्ये वादावादीविषय समिती सदस्य निवडीवरुन भाजपा- काँग्रेस सदस्यांमध्ये वादावादी 

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दहा विषय समितींचे गठन करण्यासाठी कार्यक्रम ठेवला होता. मात्र, शिवसेना आणि भाजपाच्या सदस्यांनी एकापेक्षा अनेक समितींमध्ये आपले अर्ज दाखल केल्याने अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर यांना 15 मिनिटे सभा तहकूब करावी लागली. या तहकूबीच्या कालावधीत ऍन्टी चेंबरमध्ये बऱयाच घडामोडी घडल्या. भाजपाचे आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये शाब्दिक तणातणी झाली. दीपक पवार हे स्वतःसाठी तर भीमराव पाटील काँग्रेसच्या सदस्यासाठी असे दोघेही जलव्यवस्थापनसाठी अडून बसले होते. शिवसेनेचे सुग्रा खोंदू यांनीही आक्रमकपणाने मागणी केल्याने वाद विकोपाला जाण्यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी समजूत घातल्यानंतर यावर तोडगा पडला अन् बिनविरोध निवडी पार पडल्या.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांची सदस्यांची निवडीचा विषय महत्वाचा होता. त्याच अनुषंगाने सकाळी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांची बैठक पार पडली. त्यानंतर जिल्हा परिषदेत अर्जही दाखल केले होते. सभा सुरु असताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांनी विषयाचे वाचन करताना विषय समित्यांसाठी सदस्यांचे आलेल्या अर्जाचे वाचन केले. त्यामध्ये महिला बालकल्याणसाठी 1 अर्ज जादा, पशुसंवर्धनसाठी 1 कमी, स्थायीसाठी 1 अर्ज जादा, आरोग्यसाठी 1 कमी, शिक्षणसाठी 1 जादा, बांधकामसाठी 1 जादा, जलव्यवस्थापनसाठी 1 जादा, अर्थसाठी 1 जादा असे सांगितल्यानंतर अध्यक्षांसह राष्ट्रवादीचे सर्वच सदस्य कोडय़ात पडले. अध्यक्ष संजीवराजे यांनी लगेच 2 वाजून पाच मिनिटांनी सभा 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यावरुन तेथून उठून मोजकेच सदस्य ऍन्टी चेंबरला बसले. त्यामध्ये दीपक पवार आणि भीमराव पाटील यांच्यामध्ये जोरदार शाब्दीक चकमक उडाली. जलव्यवस्थापन समितीमध्ये काँग्रेसला संधी मिळावी, अशी मागणी भीमराव पाटील यांनी जोरकस मांडली. त्यामध्ये दीपक पवार हेही मागे घेण्यास तयार नव्हते. यामध्ये शिवसेनेच्या सुग्रा खोंदू यांनीही आक्रमकपणा घेतला होता. हा वाद विकोपाला जाण्यापूर्वीच संजीवराजेंनी दीपक पवारांची समजूत काढली. त्यानुसार ऍन्टी चेंबरला निर्णय होवून सर्वच सदस्य सभागृहात आल्यानंतर पुन्हा सभेला प्रारंभ झाला.

अध्यक्षांनी बिनविरोध निवडी जाहीर केल्या गेल्या. यामध्ये शिवसेनेच्या प्रणीता जंगम यांनी दाखल केलेल्या तीन अर्जापैकी पशुसंवर्धन आणि जलव्यवस्थापन अशा दोन्हीमधून माघार घेतली. तर दीपक पवार यांनी जलव्यवस्थापनमधून अर्ज मागे घेतला. स्थायीमधून व आरोग्यमधून पाटण तालुका विकास आघाडीचे विजय पवार यांनी मागे घेतला तर शिक्षणमधून आशिष कचरे व मनोज घोरपडे यांनी अर्ज मागे घेतला तसेच जलव्यवस्थापनमधून शिवसेनेच्या सुग्रा खोंदू यांनी अर्ज मागे घेतले.

उदय कबुले हे राष्ट्रवादीमध्ये पुन्हा प्रवेश केलेले, आमदार मकरंद पाटील यांचे सच्चे कार्यकर्ते अशीच ओळख असून त्यांना या निवडीमध्ये जॅकपॉट लागला आहे. स्थायी समितीमध्ये घेण्यात आले आहे. या समितीमध्ये अनुसूचित जाती किंवा जमातींमधून सुरेंद्र गुदगे, प्रदीप विधाते, सर्वसाधारणमधून भीमराव पाटील, मानसिंगराव जगदाळे, जयवंत भोसले, रमेश पाटील, उदय कबुले आणि सुवर्णा देसाई यांनी संधी दिली गेली.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!