|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » निवडणूक आयोगाशी संगनमत करुन भाजपने सत्ता मिळवलीनिवडणूक आयोगाशी संगनमत करुन भाजपने सत्ता मिळवली 

प्रतिनिधी /कागल :

भाजप शासनाने सत्तेच्या जोरावर एव्हीएम मशिनमध्ये फेरफार करुन सत्ता मिळविली आहे. असा देशभर त्यांच्यावर अक्षेप घेतला जात आहे. शिवाय याबाबतचे अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. भाजप आणि निवडणूक आयोग यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या मशिनमध्ये गडबड करण्यात देशातील सर्वच यंत्रणा सहभागी असल्याचा आरोप बहुजन क्रांती मोर्चाचे नेते  बाळासाहेब पाटील यांनी केला.

येथील गैबी चौकामध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत हेते. यावेळी सिध्दार्थ नागरत्न, विलास सुर्यवंशी, गौरव पनोरीकर, भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या तालुक्याध्यक्ष सायरा सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.

बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून             डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतील 19 कलमाप्रमाणे सर्वांना मतदानाचा अधिकार दिल्याचे सांगितले. आता निवडणुकांत एव्हीएम मशिनचा वापर केला जात आहे. या मशिनमध्ये मोठय़ा प्रमाणात फेरफार करुन सत्ता काबिज करण्याचे धोरण सत्ताधारी पक्षाने अवलंबिले आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला जीथं गर्दी होत नाही त्या ठिकाणचे त्यांच्या पक्षाचे उमेदवार विजयी होत आहेत. हे एव्हीएम मशिनमध्ये केलेल्या फेरबदलाचा परिणाम आहे. भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगाने संगनमत करुन एव्हीएम मशिनमध्ये गडबड केली आहे, असा आरोप त्यांनी केला.

जिल्हाध्यक्ष गौरव पनोरीकर म्हणाले, 85 टक्के बहुजन समाजावर 15 टक्के लोकांचं राज्य आहे. आज त्यांच्या हक्क आणि अधिकारावर गदा येत आहे. आज साडे सहा हजार जातींचा असणारा बहुजन समाज जागृत झाला आहे. या समाजाच्या मागण्या मान्य करुन त्यांना हक्क आणि अधिकार द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.  सिध्दार्थ नागरत्न यांनी सध्या देशभर एव्हीएम मशिनचा घोटाळा गाजत आहे. मशिनद्वारे घेणाऱया निवडणुका बंद करुन पूर्वीप्रमाणेच बॅलेट पेपरचा वापर करावा, अन्यथा सव्वाशे कोटी जनतेचा विश्वासघात होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मोर्चाच्या माध्यमातून पाच महिलांना तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!