|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ..अन्यथा आम्ही मृतदेह बाहेर काढणार!..अन्यथा आम्ही मृतदेह बाहेर काढणार! 

सावंतवाडी : सावंतवाडीतील श्रमविहार कॉलनीशेजारील रहिवासी जागेत निरवडे येथील ख्रिश्चन महिलेचा मृतदेह दफन करण्यात आला आहे. हा मृतदेह येत्या 48 तासात प्रशासनाने बाहेर न काढल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दलामार्फत तो हिंदू रिवाजाप्रमाणे बाहेर काढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्या मृतदेह कोठे ठेवायचे हे परिस्थितीनुसार ठरविण्यात येईल, असे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संघटक रवींद्र तांबोळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक महादेव राऊळ उपस्थित होते. स्वराज्य संघटनेच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा असल्याचे असे त्यांनी सांगितले.

सावंतवाडीमध्ये सध्या मृतदेह दफन प्रकरणावरून वाद सुरू आहे. स्वराज्य संघटनेने शहर बंदचा इशारा दिल्यानंतर आता विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणात उडी घेतली आहे.

पर्णकुटी विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत तांबोळकर म्हणाले, मृतदेह दफन प्रकरणातून निर्माण झालेला वाद पालकमंत्री केसरकर यांनी मिटविण्याचा प्रयत्न केला. तीन वर्षांनंतर मृतदेहाच्या अस्थी बाहेर काढण्याचा तोडगा काढण्यात आला. मात्र, हा तोडगा रहिवाशांना मान्य नाही. याबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहेत. 48 तासात हा मृतदेह बाहेर न काढल्यास आम्ही बाहेर काढून तो न. प. कार्यालय, पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी की पोलीस ठाण्यात ठेवायचा हे त्या परिस्थितीनुसार ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले. नगरापलिकेच्या हद्दीत मृतदेह दफन करताना परवानगी घेतली होती का, याची चौकशी करून जर परवानगी घेतली नसेल, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी आपली मागणी असल्याचे तांबोळकर यांनी म्हटले आहे.

                स्वराज्य संघटनेचा बंद मागेकायदेशीर लढा देण्याचा निर्णय

दफन केलेल्या मृतदेहाच्या विषयावरून स्वराज्य संघटनेने शहर बंदची दिलेली हाक स्थगित केली आहे. गुरुवारी सायंकाळी सावंतवाडी पोलीस ठाण्यात स्वराज्य संघटना व पोलिसांची एकत्रित बैठक झाली.या बैठकीत स्वराज्य संघटनेने दिलेल्या निवेदनात सावंतवाडी शहराची संस्कृती व शांतता अबाधित राहवी, यासाठी आम्ही पुकारलेली बंदची हाक स्थगित ठेवत असून घरालगत दफन केलेल्या मृतदेहाबाबत कायदेशीर लढा लढला जाईल. सर्व सावंतवाडीकर एकत्र येऊन कायदेशीरपणे आवाज उठविला जाईल. 1994-95 मध्ये आत्मेश्वर मंदिर भागात असाच प्रकार झाला होता. त्यावेळी तो मृतदेह काढून योग्यरित्या दफन करण्यात आला होता. ही सावंतवाडीची संस्कृती अबाधित राहवी, असे आपले प्रयत्न राहतील, असे स्पष्ट केले.पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अमोल साटेलकर, श्रीपाद सावंत, राजू कासकर आदी उपस्थित होते.

     दफनभूमीसाठी दुसरी जागा  देण्याचा प्रश्नच नाही! – माजी उपनगराध्यक्ष बिद्रे

सावंतवाडी नगरपालिकेने सन 2000 मध्ये ख्रिश्चन समाजासाठी अधिकृतरित्या दफनासाठी जागा आरक्षित करून उपलब्ध करून दिली आहे. ही पर्यायी जागा देण्यात आलेली असताना शहरातील अन्य जागा दफनभूमीसाठी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बिद्रे यांनी स्पष्ट केले. बिद्रे पुढे म्हणाले, शहरात ख्रिश्चन समाजासाठी दफन भूमी आहे. त्या व्यतिरिक्त पोर्तुगीज काळातील सालईवाडा येथील दफनभूमी जमीन साफसफाई करून आरक्षित करून देण्यात आली होती. त्या काळात नगराध्यक्ष म्हणून आताचे पालकमंत्री दीपक केसरकर, तर उपनगराध्यक्ष मी होतो. आपण त्यावेळी स्वतः ही जागा मोकळी करून दिली होती. या पोर्तुगीज काळातील उल्लेख असलेल्या या जागेत दोन भाग करून एका भागात ख्रिश्चनांसाठी व दुसऱया भागात प्रोटेस्टंटसाठी ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता, असे बिद्रे म्हणाले.सावंतवाडी पालिकेत दोन दिवसापूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर व सर्व अधिकारी यांची बैठक झाली. त्यामाध्ये ख्रिश्चनांसाठी दफनासाठी पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेतला होता. ही जागा पर्यायी अगोदरच दिली असताना अन्य जागेची आवश्यकता का, असा सवाल बिद्रे यांनी केला आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!