|Saturday, July 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दोन दुचाकींच्या टकरीत एक ठार ; तीन जण जखमीदोन दुचाकींच्या टकरीत एक ठार ; तीन जण जखमी 

येळ्ळूर :

येळ्ळूर-वडगाव मार्गावर बुधवार दि. 19 रोजी रात्री 12:15 वा. दरम्यान दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या टकरीत दुचाकीस्वार राजू रामा झंगरुचे (वय 17) रा. वडगाव (मूळगाव सोनोली) याचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले हृतिक राजू सावंत (वय 17) रा. वडगाव, भूषण सुनील मोरे (वय 17) रा. शहापूर हे जखमी झाले. समोरून येळ्ळूरकडे येणारे दुचाकीस्वार मनोज बाबुराव गोरल (वय 24) रा. येळ्ळूर हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर केएलईएस रूग्णालयात उपचार चालू आहेत.

राजू झंगरुचे यांच्या पश्चात आई-वडील व भाऊ आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, येळ्ळूर यात्रोत्सवाहून पल्सर दुचाकी क्र. केए 22 ईव्ही 3934 या दुचाकीवरून रात्री 12 वाजता राजू रामा झंगरुचे, हृतिक राजू सावंत व भूषण सुनील मोरे हे वडगावकडे जात होते. त्यावेळी वडगावहून आपली डय़ुटी संपवून मनोज बाबुराव गोरल हे आपल्या एचएफ डिलक्स क्र. केए 22, ईएम 0005 दुचाकीवरून येत होते. यावेळी येळ्ळूर सीमेजवळ दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला. दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. राजू झंगरुचे याच्यावर केएलईएस रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अन्य तिघांवर उपचार चालू आहेत.

गुरुवारी राजू झंगरुचे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर झंगरुचे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. राजू, हृतिक, भूषण या तिघांनी अकरावीची परीक्षा दिली असून मनोज गोरल हे सिक्मयुरिटीची सेवा बजावत आहेत. सेवा बजावून घराकडे येत असताना हा अपघात घडला.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!