|Monday, July 31, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजीत आजपासून कोकण फळ महोत्सव



पणजीत आजपासून कोकण फळ महोत्सव 

प्रतिनिधी /पणजी :

 बॉटेनिकल सोसायटी ऑफ गोवा तसेच पणजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार 21 ते 23 एप्रिल पर्यंत कांपाल येथील लुईस गोमस् उद्यानात कोकण फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या महोत्सवामध्ये फळांविषयी माहिती देणारे विविध स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. तसेच यामध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या असून यासाठी सुमारे 250 स्पर्धकांची नोंदणी करण्यात आली आहे. यंदाच्या महोत्सवामध्ये गावठी केळी व आंबा यांच्यावर जास्त भर देण्यात येणार आहे.

 या महोत्सवामध्ये गोवा, कोकण तसेच अन्य भागातील आंबा बागायतदार मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच कृषी खाते, भारतीय कृषी संशोधन केंद्र, पश्चिम घाट कोकण फाऊंडेशन, गोवा कंझ्युमर्स ऍक्शन नेटवर्क, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोटिक मॅनेजमेंट (बारामती) गोवा फलोत्पादन महामंडळ, वेंगुर्ले फळ संशोधन केंद्र यांचे सहकार्य या महोत्सवाला लाभणार आहे.

 या शिवाय या महोत्सवामध्ये विविध फळांचे प्रदर्शन तसेच गोवा कृषी महाविद्यालयातर्फे लोककला सादर केली जाणार आहे. गोव्याबरोबरच कोकण कृषी महाविद्यालय, वेंगुर्ला सहभागी होणार आहे. यावेळी काजू आंबा या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच कृषी संशोधन केंद्रातर्फे शेतकऱयांना मार्गदर्शन केले जाणार आहे. हा महोत्सव सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!