|Friday, July 28, 2017
You are here: Home » क्रिडा » आमलाचा ‘हमला’, तरीही मुंबई जिंकली!आमलाचा ‘हमला’, तरीही मुंबई जिंकली! 

वृत्तसंस्था /इंदोर :
हाशिम आमलाच्या (60 चेंडूत नाबाद 104) तडफदार पहिल्या शतकानंतरही मुंबई इंडियन्सने आयपीएल साखळी सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा तब्बल 8 गडी राखून एकतर्फी धुव्वा उडवत या हंगामातील सर्वात धक्कादायक विजय नोंदवला. प्रारंभी, आमलाच्या धुवांधार शतकामुळे पंजाबने 20 षटकात 4 बाद 198 अशी आव्हानात्मक धावसंख्या रचली. पण, प्रत्युत्तरात सामनावीर जोस बटलर (37 चेंडूत 77), नितीश राणा (34 चेंडूत नाबाद 62), पार्थिव पटेल (18 चेंडूत 37) यांच्या तडफदार फलंदाजीमुळे मुंबईने 15.3 षटकात दोनच गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.
विजयासाठी 199 धावांचे आव्हान असताना पार्थिव पटेल व बटलर यांनी 5.5 षटकातच 81 धावांची सलामी देत विजयाची भक्कम पायाभरणी केली. पुढे, पटेल बाद झाल्यानंतर बटलरने नितीश राणासमवेत 7.2 षटकात 85 धावांची आतषबाजी करत विजयाचे लक्ष्य अगदी आवाक्यात आणून ठेवले. बटलर बाद झाला, त्यावेळी मुंबईने 13.1 षटकातच 2 बाद 166 धावा जमवल्या होत्या. अर्थात, फटकेबाजीचा हा टेम्पो नितीश राणाने कायम ठेवताना 34 चेंडूत नाबाद 62 धावा झोडपल्या. त्याच्या खेळीत तब्बल 7 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. त्याला हार्दिक पंडय़ाने देखील चांगली साथ दिली. हार्दिकने 4 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह नाबाद 15 धावा जमवल्या. या सांघिक कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने 15.3 षटकातच विजयाचे लक्ष्य गाठले.
आमलाचे धुवांधार शतक निष्फळ
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर आमलाने टी-20 क्रिकेटमध्ये पहिलेवहिले शतक साजरे केले. दुसरीकडे, अवघ्या 18 चेंडूत जलद 40 धावा फटकावणाऱया ग्लेन मॅक्सवेलने देखील पंजाबच्या डावात मोलाचा वाटा उचलला. त्याने चौफेर फटकेबाजी करत मुंबईच्या अनेक गोलंदाजांचे पृथक्करण अक्षरशः बिघडून टाकले. वास्तविक, आमलाला मॅकक्लॅघनच्या डावातील दुसऱयाच षटकात बाद करण्याची मुंबईकडे नामी संधी होती. पण, त्यावेळी बॅकवर्ड पॉईंटवरील नितीश राणाला त्याचा कठीण झेल टिपता आला नव्हता.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!