|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » शिवराज पाटील यांच्या मुलाच्या कंपनींवर आयकर विभागाची धाड

शिवराज पाटील यांच्या मुलाच्या कंपनींवर आयकर विभागाची धाड 

ऑनलाईन टीम / मुंबई :

माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या मुलाच्या मालकीच्या असलेल्या कंपनींवर आयकर विभागाने कारवाई केली. देशातील विविध ठिकाणी धाड टाकली आहे. त्यांच्यावर बोगस शेअर कॅपिटल गोळा केल्याचा आरोप आहे.

शिवराज पाटील यांचे पुत्र शैलेश पाटील यांच्या मालकीची असलेल्या एनव्ही ग्रुप कंपनीवर आयकर विभागाने धाड टाकली. आयकर विभागाकडून दिल्ली, पंजाब आणि चंदीगड या राज्यांत धाडसत्र सुरु असून, या कारवाईमध्ये 1 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. बोगस शेअर कॅपिटल गोळा करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.