|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » आमदार बच्चू कडूंना गुजरात पोलिसांकडून अटक

आमदार बच्चू कडूंना गुजरात पोलिसांकडून अटक 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

आमदार बच्चू कडू यांना गुजरात पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी आमदार कडू यांना आसूड यात्रेत मेहसानात गुजरात पोलिसांकडून अटक करण्यात आली.

शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी आमदार कडू यांनी आसूड यात्रा काढली. या यात्रेचा आजचा शेवटचा दिवस होता. या दिवशीच आमदार कडू हे वडनगरला जात असताना कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना मेहसानात गुजरात पोलिसांनी अटक केली.