|Thursday, July 27, 2017
You are here: Home » Top News » इसिससाठी काम करणाऱया तरुणांना 7 वर्षे तुरुंगवासइसिससाठी काम करणाऱया तरुणांना 7 वर्षे तुरुंगवास 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱया महाराष्ट्रातील मोहम्मद फरहान शेख या तरुणासह अझहर अल इस्लाम या तरुणाला दिल्लीतील विशेष न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

दिल्लीतील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमर नाथ यांनी जम्मू काश्मीरच्या अझहर अल इस्लाम आणि महाराष्ट्राच्या मोहम्मद फरहान शेख या दोघांना 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आम्हाला आमच्या कृत्यांचा पश्चाताप असून, आमची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आम्हाला पुन्हा मुख्य प्रवाहात यायचे असून आम्हाला समाजासाठी चांगले काम करायचे आहे, असे या दोघांनी अर्जात नमूद केले होते. मात्र, न्यायालयाने या दोन तरुणांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!