|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

रविवारी नवीन खरेदीचा मोह निर्माण होईल. जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. मुलांच्या गरजांचा आलेख उंचावेल. पैशाची तरतूद करावी लागेल. नोकरीत कामाचा व्याप जरी जास्त असला तरी आपल्या हुशारीने व चिकाटीने वेळेवर पूर्ण करू शकाल. शेतीच्या कामात नफा किती होत आहे याकडे लक्ष ठेवा. कर्जाचे डोंगर वाढू देऊ नका.


वृषभ

मुले आनंद देतील. सुट्टीत प्रवासाचे बेत आखले जातील. सोमवार, मंगळवार काही कारणानुसार मनावर थोडे दडपण राहील. राजकीय क्षेत्रात शत्रुपक्षाच्या डावपेचावर लक्ष ठेवा. कला क्रीडा क्षेत्रात संधी मिळेल. प्रकृतीची मात्र काळजी घ्या. व्यवसायात आक्रमक न होता शांतपणे प्रकरणे हाताळणे गरजेचे आहे. मित्र परिवाराकडून मदतीचा हात पुढे येईल.


मिथुन

आपली आवक पाहूनच खर्च करावा, अनावश्यक खर्च टाळा. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. बुधवार, गुरुवार कौटुंबिक प्रश्न निर्माण होण्याची शक्मयता आहे. घराच्या, प्रॉपर्टीच्या वाटाघाठीत गैरसमज, वाद, होतील. आपल्यावर खोटे आरोप होतील. नाटय़, चित्रपट क्षेत्रात जिद्दीने आपले स्थान टिकवून ठेवावे लागेल.


कर्क

अविवाहितांना चांगली स्थळे मिळतील. गणपतीची उपासना केल्याने घरावरील संकटे दूर होतील. मानसिक ताण यंदाच्या आठवडय़ात कमी होईल. नोकरीत, व्यवसायात प्रगती संभवते. राजकारणात, समाजकार्यात प्रति÷ा वाढेल. या आठवडय़ात महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन भेटीगाठी संभवतात. प्रवासाचे बेत आखले जातील.


सिंह

प्रेम प्रकरणात यश मिळेल. आठवडय़ाची सुरुवात थोडी कटकटीची असली तरी पुढचे दिवस समाधानी असतील. आपला प्रगतीरथ आता वेगाने धावणार आहे. काही छोटय़ा चुका जरी आपल्या हातून आमच्या कालावधीत झाल्या तरी त्याकडे फारसे लक्ष जाणार नाही. मात्र त्या लवकरच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. शेतीच्या कामात यश मिळेल.


कन्या

 प्रसिद्धीचा विचार न करता समाजकार्य करत रहा. आपल्या मेहनतीचे फळ ग्रह आपणास पुढील काळात चांगलेच देणार आहे. राजकीय क्षेत्रात आपल्यावर टीकास्त्र होतील. शत्रुपक्ष आपणास खाली मान घालण्यास यशस्वी होतील. नामुष्की देखील होण्याची शक्मयता आहे. मात्र खचून जाऊ नका. पुढे काळ चांगला येणार आहे. आध्यात्मिक शक्ती वाढवा.


तूळ

 उत्साह व आत्मविश्वास असल्यामुळे येणाऱया संकटांवर मात करता येईल. प्रकृतीची काळजी घ्या. दुखापत संभवते. आप्तेष्ट व  मित्र यांच्यात किरकोळ वाद संभवतो. राजकीय, सामाजिक कार्याचा व्याप वाढेल. वरि÷ खूष होतील. शेतकरी वर्गाला प्रसिद्धी मिळेल. खर्च वाढेल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. यश सोपे नाही.


वृश्चिक

धंद्यातील अंदाज बुधवार, गुरुवार चुकण्याची शक्मयता आहे. राजकीय सामाजिक कार्यात तारेवरची कसरत करावी लागेल. विरोधक प्रभावित होतील. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखावी लागेल. मान सन्मानाचा योग येईल. संसारात संयमाने वागा. कोर्टकेसमध्ये शब्द जपून वापरा. शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण होईल.


धनु

संततीच्या संबंधी असलेली चिंता कमी होऊ शकेल. भिडस्तपणा न ठेवता राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मत वरि÷ांच्या पुढे ठेवा. अधिकार मिळण्याचा योग येईल. धंद्यात लाभ होईल. नवा प्रयोग शेतीच्या कामात प्रसिद्धी मिळवून देईल. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. शिक्षणात पुढे याल.


मकर

आत्मविश्वास उपयोगी पडेल. अहंकार मात्र ठेऊ नका. म्हणजे तुमच्या क्षेत्रात काम करणे अधिक सोपे होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रसिद्धी होईल. तरीही तुमच्यावर टिकात्मक चर्चा होईल. नवे परिचय होतील. नावलौकीक, कला क्रीडा क्षेत्रात मिळेल. पोटाला गरमीभास होऊ शकतो. पाणी जास्त घ्या.


कुंभ

व्यापक स्वरुपात कार्य करण्याचा उत्साह राहील. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे आक्रमक मत सर्वांच्या उत्साहाचे कारण बनू शकते. मानसन्मानाचा योग येईल. दर्जेदार व्यक्तींचा परिचय होईल. धंदा वाढेल. संसारातील कमी भरून काढण्यासाठी नवा पर्याय मिळेल. खरेदी विक्रीत लाभ मिळेल.


मीन

या सप्ताहात तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होतील. वेळ फुकट घालवू नका. ग्रहांची साथ कमी वेळ असते.  नोकरी, धंद्यात व शेतीत चांगला निर्णय घेता येईल. नवा प्रयोग यशस्वी झाल्याने पुरस्कार मिळू शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात अधिकार वाढतील. शिक्षणात मोठे यश मिळेल. प्रगतीची संधी सोडू नका.

Related posts: