|Sunday, May 19, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » 25 वर्षांपासून झाडांची पाने खाऊन जगतो हा माणूस

25 वर्षांपासून झाडांची पाने खाऊन जगतो हा माणूस 

ऑनलाईन टीम / लाहोर  :

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक माणूस गेली 25 वर्षे फक्त झाडांची ताजी पाने व लाकूड खाऊन जगत असून तो कधीही आजारी पडलेला नाही.

गुजरानवाला जिह्यात राहणाऱया 50 वर्षाच्या व्यक्तीचे नाव मेहमुद बट असे असून काहीही कामधंदा नसल्याने , एका वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडली, तेव्हा सुमारे 25 वर्षांपूर्वी त्याने झाडांची पाने खाण्यास सुरूवात केली. त्यानंतर, आता पाने व लाकूड खाऊन जगणे त्याच्या जणू अंगवळणीच पडले आहे. असे वृत्त ‘दि न्यूज इंटरनॅशनल’ने दिले. मेहमूद बटने या वृत्तपत्रास सांगितले की, माझ्या घरात अठरा विश्वे दारिद्रय होते. काहीही घेण्याची एपत नव्हती व एक वेळेच जेवण मिळणेही मुश्कील व्हायचे. त्या वेळी रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा लाकूड खाऊन जगणे चांगले, असा विचार केला आणि हा आहार सुरू केला. या बातमीनुसार हळूहळू मेहमद बटची परिस्थिती सुधारली. त्याला काम मिळू लागते व जेवणखाण करणेही परवडू लागले. तरीही इतर अन्नापेक्षा त्याला ापाने व लाकूडच खात राहावसे वाटत राहिले व त्याने तोच आहार आजपर्यंत सुरू ठेवले आहे.

 

Related posts: