पन्हाळय़ात उन्हाळी व्हॉलिबॉल प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

पन्हाळा / प्रतिनिधी
पन्हाळा येथील व्हॉलीबॉलची परंपरा लाभलेले व गेली 3 तपे व्हॉलीबॉल क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱया शाहू क्रीडा मंडळ यांच्यावतीने नगरपरिषदेच्या मयुरबन येथील क्रीडांगणावर उन्हाळी व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा रुपाली धडेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका वीणा बांदिवडेकर, सुरेखा गोसावी, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप जोशी, राष्ट्रीय प्रशिक्षक मारुती काशीद, विकास कांबळे, राष्ट्रीय खेळाडू अबिद मोकाशी उपस्थित होते.
या 15 दिवस चालणाऱया व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिराची सांगता 5 मे ला होणार आहे. शिबिरामध्ये 12 ते 20 वर्षे वयोगटातील मुले व मुली अशा सुमारे 50 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. सकाळी 6 ते 9, संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत खेळाडूंना मार्गदर्शन दिले जाते. मंडळाचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप, राष्ट्रीय प्रशिक्षक मुंतजर मुजावर, कपील खोत, योगेश वराळे यांच्या मार्गर्शनाखाली शिबिर सुरु आहे.