|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चक्क अस्थी-राख गायब

चक्क अस्थी-राख गायब 

प्रतिनिधी/ बेळगाव

21 व्या शतकात वावरत असताना अंधश्रद्धेचा पगडा अजूनही दूर झाला नाही. चौकाचौकात लिंबू, बाहुली, नारळ, गुलाल टाकण्याचे प्रकार सर्रास दिसतात. सोमवारी तर साऱयांना अचंबित करणारी एक घटना वडगाव स्मशानभूमीमध्ये दिसून आली. या घटनेमुळे रक्षाविसर्जनासाठी गेलेले सारेच नातेवाईक संतप्त झाले. येळ्ळूर रस्त्यावर अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या राजू झंगरूचे याच्या अस्थी व राख गायब केली आहे.

येळ्ळूर रस्त्यावर बुधवार दि. 19 रोजी रात्री 12.15 च्या सुमारास दोन मोटार सायकलींच्या धडकेत राजू झंगरूचे (वय 17, रा. वडगाव, मूळ गाव सोनोली) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी वडगाव स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणात राजू याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर सोमवार दि. 24 रोजी रक्षाविसर्जन करण्यासाठी सर्वच नातेवाईक आले होते. मात्र स्मशानातील दृष्य पाहून सारेच जण हादरून गेले.

राजू याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणी लिंबू, भात, बाहुले व कोंबडा कापून टाकण्यात आला होता. हे दृष्य पाहिल्यानंतर सारेच जण घाबरले. महत्त्वाचे म्हणजे राजू याच्या अस्थी आणि राखही तेथून गायब करण्यात आली होती. यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.

या घटनेनंतर काही जणांनी ज्ये÷ व जाणकार नागरिकांचा सल्ला घेऊन पुढील सोपस्कार पूर्ण केले. या घटनेमुळे रक्षा विसर्जन करण्यास विलंब लागला. यामुळे नातेवाईकांनाही बराच उशीर ताटकळत थांबावे लागले. 

Related posts: