|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » पनवेल महापालिकेत भाजप स्वबळावर लढणार, आ. प्रशांत ठाकूर यांचे संकेत

पनवेल महापालिकेत भाजप स्वबळावर लढणार, आ. प्रशांत ठाकूर यांचे संकेत 

आनलाईन टीम / नवी मुंबई   :

पनवेल महापलिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी तसे संकेत दिले आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे,पण अद्यापही शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव आलेला नाही त्यामुळे शिवसेना कुठलीच भूमिका घेत नसल्याने सध्या तरी भाजपते स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.

पनवेल महापालिकेसाठी 24 मे रोजी मतदान होणार असून महापालिकेसाठी काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित येऊन महाआघाडी स्थापन केली आहे. तर दुसरीकडे सेना आणि भाजपची स्वबळाची तयारी सुरू आसल्याने, महपालिकेत तिरंगी लढत होणार आहे.