|Thursday, August 22, 2019
You are here: Home » leadingnews » मल्ल्या लवकरच भारतात येणार ; सीबीआयचे पथक लंडनमध्ये दाखल

मल्ल्या लवकरच भारतात येणार ; सीबीआयचे पथक लंडनमध्ये दाखल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मद्यसम्राट विजय मल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱयांचे पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे मल्ल्याला भारतात लवकरच परत आणले जाणार आहे.

कोटय़वधींचे कर्ज थकवून भारतातून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारत सरकारकडून फरारी घोषित केले आहे. आता त्याला भारतात लवकरच परत आणले जाणार आहे. विजय मल्ल्याला मागील महिन्यात लंडनमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मल्ल्याला सशर्त जामीन देण्यात आला. मल्ल्याला भारताने केलेल्या अपीलावर स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. दोन्ही देशांमध्ये मल्ल्याबाबत तोडगा निघाला आहे. त्यामुळे मल्ल्याला भारतात लवकरच परत आणले जाण्याची शक्यता वाढल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.