|Sunday, January 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेच्या दूतावासानजीक आत्मघाती हल्ला, 8 जण ठार

अमेरिकेच्या दूतावासानजीक आत्मघाती हल्ला, 8 जण ठार 

अफगाणिस्तानची राजधानी पुन्हा लक्ष्य : स्फोटात 28 जण जखमी

वृत्तसंस्था / काबुल

अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे बुधवारी अमेरिकेच्या दूतावासानजीक एक मोठा आत्मघाती हल्ला झाला. एका आत्मघाती कारबॉम्बरने नाटोच्या ताफ्याला लक्ष्य केले. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला तर 28 जण जखमी झाले आहेत. हा हल्ला आपल्या सदस्यांनी घडवून आणल्याचा दावा इस्लामिक स्टेटने केला आहे.

 पूर्व अफगाणिस्तानात अमेरिकेद्वारे आपला सर्वात मोठा अण्वस्त्रविरहित बॉम्ब टाकण्यात आल्याच्या 3 आठवडय़ानंतर हा स्फोट घडवून आणला गेला. नाटोच्या ताफ्यात सामील जवानांसाठी शस्त्रास्त्रs नेणाऱया वाहनांना लक्ष्य करण्यात आल्याचे अफगाणच्या अधिकाऱयांनी सांगितले. हल्ला बुधवारी सकाळी काबुलच्या एका गर्दीच्या भागात नाटो मुख्यालय आणि अमेरिकेच्या दूतावासानजीक झाला. हल्ल्यात ठार झालेले बहुतेक जण नागरिक असल्याचे अफगाण आरोग्य अधिकाऱयाकडून सांगण्यात आले.

नाटोचे 3 जवान जखमी

हल्ल्यात नाटोचे 3 जवान देखील जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या लष्करी प्रवक्त्यानुसार जखमी जवानांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत त्यांचे राष्ट्रीयत्व उघडण्यास नकार दिला आहे.

इस्लामिक स्टेटचा दावा

या हल्ल्याची जबाबदारी आयएसची वृत्तसंस्था अमाकने स्वीकारली आहे. मृतांमध्ये सर्व अमेरिकेचे जवान असून हा एक आत्मघाती कारबॉम्ब हल्ला होता, या हल्ल्यामुळे नाटोच्या शस्त्रास्त्रांनी भरलेल्या 2 वाहनांना नुकसान पोहोचल्याचे अमाककडून सांगण्यात आले. याशिवाय 3 नागरी वाहनांना नुकसान पोहोचले आहे.

मागील महिन्यात लष्करी तळावर हल्ला

याआधी तालिबानने 21 एप्रिल रोजी अफगाणिस्तानच्या मजार-ए-शरीफ शहरानजीक लष्करी तळावर हल्ला केला होता, यात 140 अफगाण जवान मारले गेले होते. मजार-ए-शरीफ बल्ख प्रांताची राजधानी असून हल्ला एका मशिदीत नमाज पढणाऱया जवानांवर करण्यात आला होता.

 

Related posts: