|Monday, April 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » यूएईनंतर ब्रिटनमध्येही जप्त होणार दाऊदची मालमत्ता

यूएईनंतर ब्रिटनमध्येही जप्त होणार दाऊदची मालमत्ता 

लंडन :

 अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भले पाकिस्तानात वास्तव्य करून स्वतःला सुरक्षित मानत असला तरी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्याच्यामागील ससेमिरा कायम ठेवला आहे. मोदी सरकारने ब्रिटनच्या सरकारला दाऊदची मालमत्ता जप्त करण्याची विनंती केली आहे. याचवर्षी संयुक्त अरब अमिरातने दाऊदची हजारो कोटींची मालमत्ता जप्त केल्याचे वृत्त समोर आले होते. भारतीय यंत्रणा याप्रकरणी आधीपासूनच कार्यरत असून त्यांना ब्रिटनस्थित दाऊदच्या मालमत्तांविषयी माहिती आहे. सरकार वेळोवळी कारवाईसाठी ब्रिटनच्या हेरयंत्रणांना माहिती देत असते. दाऊदचा विदेशांमध्ये कोटय़वधींचा व्यवसाय फैलावलेला आहे. या व्यवसायाद्रे दाऊद इब्राहिम आपल्या कारवायांना मूर्त रुप देतो. भारतात अनेक वर्षांपासून दाऊद बनावट नोटा, हवाला आणि बांधकाम कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून आपली कमाई वाढवत आहे.

 

Related posts: