|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » रुळ ओलांडताना आठवडाभरात 61 जण दगावले

रुळ ओलांडताना आठवडाभरात 61 जण दगावले 

लोकल मार्गावर रेल्वे रुळ ओलांडणे धोकादायक असले तरीही अनेकदा शॉर्टकट म्हणून प्रवासी रुळ ओलांडतात आणि मृत्यूला आमंत्रण देतात. विविध अपघातांमध्ये शनिवारी एकाच दिवसात तब्बल 15 प्रवाशांनी मृत्यूला कवटाळले. तर 11 जण जखमी आहेत. 1 ते 6 मेमध्ये 61 प्रवासी रेल्वे अपघातात दगावले आहेत. यापूर्वी 24 जानेवारी रोजी 16 आणि 2 फेब्रुवारी रोजी 14 जण मफत्युमुखी पडले होते.

मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या लोकल मार्गावर विविध रेल्वे स्थानकांच्या हद्दीत शनिवार, 6 मे रोजी एकाच दिवसात 15 जणांचा मफत्यू झाला.  शनिवारच्या अपघाती संख्येत सर्वात जास्त प्रवासी कुर्ला रेल्वे हद्दीत मफत पावले आहेत. या एकाच स्थानक परिसरात 5 प्रवासी मफत आणि एक जखमी झाला आहे. त्यापाठोपाठ कल्याण येथे 3 जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी आहेत. त्यानंतर वसई येथे दोघांच्या मफत्यूची नोंद आहे.

प्रवाशांप्रमाणेच रेल्वे रुळांजवळ राहणाऱया रहिवाशांकडून रुळ ओलांडण्याकडे कल असतो. त्यातूनच लोकलची धडक बसल्याने प्रवासी वा अन्य रहिवासी जखमी वा मफत पावत असल्याचे रेल्वे अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे प्रवासातील अपघात कमी करण्यासाठी रेल्वेकडून विविध प्रतिबंधक उपाय योजण्यात येत आहेत. त्यात संरक्षक भिंत, अडथळे उभारले जातात. पण, तरीही अनेकदा शॉर्टकटचा पर्याय अपघाताच्या वाटेवर नेतो, असे मत रेल्वे अधिकारी व्यक्त करतात.