|Monday, December 17, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नक्षली हिंसाचार, सीमेवरील घटना भारतासाठी आव्हान

नक्षली हिंसाचार, सीमेवरील घटना भारतासाठी आव्हान 

टोकिया :

 भारताच्या काही भागांमध्ये अतिवादी डाव्या संघटनांद्वारे होणारा हिंसाचार आणि सीमेपलिकडून वेळोवेळी होणाऱया घटना या काही व्यक्तींच्या अतिवादी विचारांपेक्षा अधिक गंभीर आव्हान असल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री अरुण जेटलींनी सोमवारी केले आहे.भारतात समुदायांमधील संबंधांच्या संदर्भात अधिक गंभीर आव्हान निश्चितच नाही असे जेटलींनी हिंदू-मुस्लीम तणाव आणि भारताच्या आर्थिक विकासावर याच्या प्रभावाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नादाखल सांगितले. भारतात चर्चा आणि व्यक्तींद्वारे वेळोवेळी केली जाणारी वक्तव्ये शांततापूर्ण असतात. एका मोठय़ा लोकशाहीत अतिवादी विचारांचे व्यक्ती असतील, वक्तव्ये दिली जातात, हे दोन्ही बाजूने होते असा दावा त्यांनी केला.देशात कोणतीही तणावपूर्ण तसेच संघर्षाची स्थिती नाही. अतिवादी लेफ्ट संघटनेद्वारे मध्य भारताचा काही भाग आणि आदिवासी भागांमध्ये केल्या जाणाऱया हिंसाचाराची समस्या आहे. हे एक मोठे आव्हान असून याप्रकारच्या हिंसाचारात निर्दोषांना जीव गमवावा लागतो असे त्यांनी म्हटले.आणखी एक आव्हान सीमेपलिकडून होणाऱया दहशतवादी कारवाया आणि तणावाचे आहे. समुदायांदरम्यान सोशल मीडियावर चर्चेपेक्षा अधिक मोठी ही आव्हाने आहेत असे त्यांनी सांगितले.

Related posts: