|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘स्वस्त नेहमीच दर्जेदार असते?’

‘स्वस्त नेहमीच दर्जेदार असते?’ 

स्वस्त औषधांचा दर्जा कायम चांगला असू शकत नाही. एखादी नामांकित कंपनी चढय़ा भावाने औषध विकताना औषध निर्मितीचे ठिकाण, हाताळणी, पॅकींग अशा सर्व बाजूंनी विचार करण्यात येतो. सध्या 28 हजार रुपये तोळा असलेले सोने पंतप्रधानांनी 5 हजार रुपये तोळय़ाने विकण्यास सांगितले. तर सोनार विकत असलेले कमी किंमतीतील सोने शुद्ध असू शकेल का? असा सवाल भारतीय औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केला. स्वस्त दरात जेनेरिक औषध विकण्याबाबत सरकारची भूमिका अद्याप औषध विक्रेत्यांनाही नीट समजलेली नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली स्वस्त आणि जेनेरिक औषध केमिस्टकडून रुग्णांना दिल्यास ती जेनेरिक औषधे ग्राहक घेतील का? औषधांचे जेनेरिक नाव ग्राहकाला समजेल का? केमिस्टकडून देण्यात येणाऱया स्वस्त जेनेरिक औषधाने कोणताही धोका झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल भारतीय औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केला.

एखाद्या बालरोगतज्ञाने सूचवलेल्या ब्रॅन्डेड जेनेरिक औषधाची चिठ्ठी औषधाच्या दुकानात तो रुग्ण केमिस्टला सुचवलेल्या ब्रॅन्डेडचे जेनेरिक जेनेरिक औषध द्या असे सुचवू शकत नसल्याचे शिंदे अनुभवातून सांगतात. रुग्णाच्या मागणीप्रमाणे  केमिस्टने स्वस्त असलेले पाच रुपये किमतीचे औषध दिल्यास ग्राहक स्वीकारेल का, असा सवालही शिंदे यांनी यावेळी केला. स्वस्त नेहमी मस्त नसते. एखादी नामांकित कंपनी जेव्हा एखाद्या औषधाची महाग किंमत घेते. मात्र, तेच औषध इतर कंपनी कमी किमतीत तयार करत असल्यास दर्जाचा प्रश्न निर्माण होणार असल्याची शंका शिंदे यांनी उपस्थित केली. केमिस्टना शरिर शास्त्राचे ज्ञान नाही. एखाद्या डॉक्टरने सुचवलेले औषध मी विकणार. मग फक्त पंतप्रधान म्हणतात म्हणून केमिस्ट ते औषध विकणार हेच मुळात न पटण्यासारखे असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया

‘स्वस्त औषधे देण्याच्या नादात गरीबांच्या आरोग्याचा विचार करण्यात यावा. केमिस्टने दिलेल्या स्वस्त औषधाचा दुष्परिणाम रुग्णावर झाल्यास पंतप्रधान मोदी, केमिस्ट आणि डॉक्टर यातील कोणाला जबाबदार धरणार?

– जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष

भारतीय औषध विक्रेता संघ