|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळी विमानतळावरील कंत्राटी कामगारांची निदर्शने

दाबोळी विमानतळावरील कंत्राटी कामगारांची निदर्शने 

प्रतिनिधी/ वास्को

दाबोळी विमानतळावर सामान वाहून नेण्याचे काम करणाऱया लोडर्सनी कामाच्या मागणीसाठी दाबोळी विमानतळाबाहेर निदर्शने केली. सदर कामगार ठेकेदाराच्या सेवेत होते. परंतु ते कंत्राट संपल्यानंतर नवीन कंत्राटदाराची नेमणुक झालेली नसल्याने या कामगारांसमोर समस्या निर्माण झालेली आहे. विमानतळ प्राधिकरणाने आपली तात्पुरती सोय पेलेली आहे.

  भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नेमलेल्या ठेकेदाराकडे 70 जण लोडर म्हणून सेवा बजावत होते. परंतु मागच्या ऑक्टोबरमध्ये कंत्राट संपल्याने या कामगारांना कुणी वाली राहिलेला नाही. दाबोळी विमानतळ प्राधिकरणाने आपली गैरसोय टाळण्यासाठी काही मजूरांची तात्पुरती निवड करून लोडरची सेवा चालू ठेवली आहे. परंतु ते 70 लोडर बेकार पडलेले आहेत. आपली सोय लोडरच्या कामासाठी करण्यात यावी अशी त्यांची मागणी असून याच मागणीसाठी त्यांनी मंगळवारी सकाळी निदर्शने केली.

दाबोळी विमानतळावर कंत्राटदारामार्फत लोडरचे काम करण्यासाठी माणसे भरती केलेली असतात. हे लोडर हवाई प्रवाशांचे सामान ट्रॉलीवर घालून वाहून नेण्याचे काम करतात. विमानतळ प्राधिकरणासाठी कंत्राटदाराचे 70 लोडर कार्यरत होते. कंत्राटदाराचे कंत्राट संपल्यामुळे लोडरची समस्या निर्माण झालेली आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे संचालक बी.सी.एच. नेगी यांनी या प्रकाराबाबत खुलासा करताना दाबोळी विमानतळ प्राधिकरणाने कुणालाही सेवेतून काढून टाकलेले नाही किंवा निलंबीत वैगेरे केलेला नाही. ते प्राधिकरणाने नेमलेल्या कंत्राटदाराचे कामगार होते. कंत्राट संपल्यानंतर मागच्या ऑक्टोबरपासून नवीन कंत्राटदार नेमण्यासाठी प्रधिकरणाने निविदा जारी केल्या होत्या. मात्र, योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. कंत्राटदाराची नेमणूक होईपर्यतच्या सोयीसाठी प्राधिकरणाने वार्षीक देखभालीसाठी नेमलेल्या आपल्या कंत्राटी कामागारांची या कामासाठी मदत घेतलेली असल्याचा खुलासा केला आहे.

Related posts: