|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कला संस्कृती संचालनालयाच्या ऍनिमेशन कार्यशाळेचे उद्घाटन

कला संस्कृती संचालनालयाच्या ऍनिमेशन कार्यशाळेचे उद्घाटन 

प्रतिनिधी/ पणजी

आज विद्यार्थ्यांसाठी अल्पकालीन विविध कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरे आदी विविध कलात्मक उपक्रम राबविले जातात. संबंधित कला आत्मसात करण्यासाठी चौकसता आणि जिज्ञासुवृत्ती अधिक महत्त्वाची असून त्यातूनच सकस आणि कल्पक असे नवे कलाकार वा तंत्रज्ञ तयार होत असतात. असे प्रतिपादन कला आणि संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक अशोक परब यांनी केले.

कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ऍनिमेशन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत कार्यशाळा मार्गदर्शक सिद्धेश गावणेकर आणि सहाय्यक प्रणाली गावणेकर उपस्थित होते. पाटो येथे संस्कृती भवन संकुलाच्या बहुउद्देशीय सभागृहात काल दि. 8 मे रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यशाळा मार्गदर्शक सिद्धेश गावणेकर यांनी ऍनिमेशन कलाप्रकार हा सांघीकतेने साकारण्याचा कलाप्रकार असून, त्यासाठी सर्वांचा सहभाग अतिमहत्वाचा असल्याचे स्पष्ट केले. सदर कार्यशाळेचे ऍनिमेशन कलेतील विविध बाबींचे विस्तृत मार्गदर्शन करणार असल्याचे स्पष्ट केले.

स्वागत सूत्रसंचालन व अभारप्रदर्शन प्रदीप नाईक यांनी केले. 8 ते 15 मे दरम्यान, चालणाऱया या कार्यशाळेत 52 मुलांमुलींनी नोंदणी केली आहे. या कार्यशाळेचा समारोप 15 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे.