|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » एसबीआचा नियम, 1 जूनपासून ग्राहकांना सर्व्हिस चार्ज लागणार

एसबीआचा नियम, 1 जूनपासून ग्राहकांना सर्व्हिस चार्ज लागणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

एसबीआयने पुन्हा एकदा आपल्या सर्व्हिस चार्जमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयने जारी केलेल्या नवे नियम 1 जूनपासून लागू होणार आहेत. या निर्णयाअंातर्गत जून्या आणि फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त सर्व्हिस चार्ज आकारला जाणार आहे. तसेच बचत खात्यातून पैसे काढणाऱया ग्राहकांनाही सर्व्हिस चार्जच भूर्दंड पडणार आहे.

एसबीआयमध्ये जुन्या नोटा बदलण्यासाठी आतापर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात होते. मात्र आता नोटा बदलण्यासाठी 2 ते 5 रूपयांचा सर्व्हिस चार्ज आकारला जाईल. यात 20 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या नोटा किंवा 5 हजार रूपयांच्या नोटा बदलून घेतल्यास 2 रूपयांचा चार्ज आकारला जाईल.

 

Related posts: