|Thursday, June 27, 2019
You are here: Home » क्रिडा » गुजरातविरुद्ध दिल्लीचा ‘डेअरडेव्हिल’ विजय

गुजरातविरुद्ध दिल्लीचा ‘डेअरडेव्हिल’ विजय 

वृत्तसंस्था/ कानपूर

आयपीएल स्पर्धेच्या दहाव्या हंगामात साखळी फेरीतच गारद झालेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने बुधवारी गुजरात लायन्सला 2 गडी व 2 चेंडूंचा खेळ बाकी राखत निसटता विजय संपादन केला. अवघ्या 57 चेंडूत 15 चौकार व 2 षटकारांसह 96 धावांची धमाकेदार खेळी साकारणारा श्रेयस अय्यर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. गुजरातने 20 षटकात 5 बाद 195 धावा जमवल्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सने श्रेयसच्या खेळीमुळे 19.4 षटकात 8 बाद 197 धावांसह  विजय संपादन केला.

प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या गुजरात लायन्सतर्फे ऍरॉन फिंचने 39 चेंडूत 6 चौकार व 4 षटकारासह सर्वाधिक 69 धावांचे योगदान दिले तर दिनेश कार्तिकने 28 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 40 धावा जमवल्या. याशिवाय, सलामीवीर इशान किशनने 25 चेंडूत जलद 25 धावा केल्या. गोलंदाजीच्या आघाडीवर दिल्लीतर्फे शमी, कमिन्स, अमित मिश्रा, ब्रेथवेट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरात दिल्ली डेअरडेव्हिल्सची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन (10), ऋषभ पंत (4), मॅरलॉन सॅम्युएल्स (1), कोरी अँडरसन (6), ब्रेथवेट (11) स्वस्तात बाद झाले. मात्र, करुण नायर (15 चेंडूत 30), पॅट कमिन्स (13 चेंडूत 24) यांनी थोडय़ाफार धावा जमवलेल्या असताना दुसरीकडे, श्रेयस अय्यरने फटकेबाजीचा सिलसिला अव्याहतपणे सुरु ठेवला. शिवाय, कठीण आव्हान असताना देखील विजय अगदी आवाक्यात आणून ठेवला. स्वतः श्रेयस 8 व्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी संघाला उर्वरित 4 चेंडूत 6 धावांची गरज होती. यावेळी अमित मिश्राने लागोपाठ 2 चेंडूत 2 चौकार ठोकत दिल्लीच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. या लढतीत श्रेयसने 57 चेंडूत 15 चौकार व 2 षटकारांसह 96 धावा जमवल्या. तसेच त्याचा स्ट्राईक रेट देखील 168.42 असा लक्षवेधी ठरला.

धावफलक

गुजरात लायन्स : डेव्हॉन स्मिथ धावचीत (मिश्रा-शमी) 8 (8 चेंडूत 1 चौकार), इशान किशन झे. खान, गो. मिश्रा 34 (25 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), सुरेश रैना त्रि. गो. कमिन्स 6 (5 चेंडूत 1 चौकार), दिनेश कार्तिक झे. अँडरसन, गो. ब्रेथवेट 40 (28 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), ऍरॉन फिंच त्रि. गो. मोहम्मद शमी 69 (39 चेंडूत 6 चौकार, 4 षटकार), रवींद्र जडेजा नाबाद 13 (7 चेंडूत 2 चौकार), जेम्स फॉकनर नाबाद 14 (8 चेंडूत 1 चौकार). अवांतर 11. एकूण 20 षटकात 5/195.

गडी बाद होण्याचा क्रम

1-21 (स्मिथ), 2-46 (रैना), 3-56 (इशान किशन), 4-148 (कार्तिक), 5-180 (फिंच).

गोलंदाजी

झहीर खान 4-0-30-0, मोहम्मद शमी 4-0-36-1, पॅट कमिन्स 4-0-38-1, अमित मिश्रा 2-0-27-1, ब्रेथवेट 4-0-38-1, कोरी अँडरसन 2-0-19-0.

दिल्ली डेअरडेव्हिल्स : संजू सॅमसन त्रि. गो. संगवान 10 (7 चेंडूत 2 चौकार), करुण नायर झे. स्मिथ, गो. फॉकनर 30 (15 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), ऋषभ पंत धावचीत (रैना) 4 (2 चेंडू), श्रेयस अय्यर त्रि. गो. बसिल थाम्पी 96 (57 चेंडूत 15 चौकार, 2 षटकार), मॅरलॉन सॅम्युएल्स धावचीत (जडेजा) 1 (4 चेंडू), कोरी अँडरसन धावचीत (अँडरसन) 6 (6 चेंडूत 1 चौकार), ब्रेथवेट झे. व गो. कुलकर्णी 11 (10 चेंडूत 2 चौकार), पॅट कमिन्स झे. स्मिथ, गो. फॉकनर 24 (13 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), मोहम्मद शमी नाबाद 4 (2 चेंडूत 1 चौकार), अमित मिश्रा नाबाद 8. (2 चेंडूत 2 चौकार). अवांतर 3. एकूण 19.4 षटकात 8/197.

गडी बाद होण्याचा क्रम

1-11 (सॅमसन), 2-15 (पंत), 3-72 (नायर), 4-92 (सॅम्युएल्स), 5-104 (अँडरसन), 6-121 (ब्रेथवेट), 7-182 (कमिन्स), 8-189 (अय्यर).

गोलंदाजी

धवल कुलकर्णी 4-0-30-1, प्रदीप संगवान 3-0-35-1, बसिल थाम्पी 3.4-0-43-1, डेव्हॉन स्मिथ 1-0-17-0, रवींद्र जडेजा 4-0-31-0, जेम्स फॉकनर 4-0-39-2.